हैदराबाद PM Jeevan Jyoti Bima Yojana : प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) ही सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी विमा सरक्षण देणारी केंद्र सरकाची योजना आहे. या योजनेअंतर्गत, 18 ते 50 वर्षे वयोगटातील व्यक्तींना नाममात्र प्रीमियमवर विमा संरक्षण मिळू शकतं. ही योजना विशेषत: समाजातील अशा घटकांना लक्षात घेऊन सुरू करण्यात आली आहे, जे महागड्या विमा योजनांचा लाभ घेऊ शकत नाहीत. या योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांचं विमा संरक्षण उपलब्ध आहे. आज आम्ही तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया कशी असते?, या योजनेसाठी अर्ज करसा करायचा?, योजनेचा लाभ घेण्यासाठी काय पात्रता असते?, इत्यादी बद्दल माहिती सांगणार आहोत.
योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता :
- वयोमर्यादा : 18 ते 50 वयोगटातील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.
- बँक खाते : प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचं बँकेत बचत खातं असणं अनिवार्य आहे.
- आरोग्य : योजनेत सहभागी होण्यासाठी कोणत्याही वैद्यकीय तपासणीची आवश्यकता नाही, परंतु व्यक्तीनं आरोग्याविषयी कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती देऊ नये.
कशी आहे अर्ज प्रक्रिया : प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी आणि जलद आहे. तुम्ही तुमच्या बँकेद्वारे अर्ज सहज करू शकता.
बँकेशी संपर्क साधा : या योजनेत सामील होण्यासाठी, प्रथम तुम्हाला तुमच्या बँकेशी संपर्क साधावा लागेल. बहुतेक सरकारी आणि खाजगी बँका या योजनेची अंमलबजावणी करतात. तुम्ही तुमच्या बँकेच्या शाखेला भेट देऊन अर्ज करू शकता, किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे देखील तुम्हाला अर्ज करता येईल.
अर्ज प्राप्त करा : तुम्हाला बँकेच्या शाखेतून प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी अर्ज मिळेल. हा फॉर्म बँकेच्या काउंटरवर किंवा बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरही उपलब्ध आहे.
फॉर्म भरा : अर्जामध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरावी लागेल, जसं की नाव, जन्मतारीख, बँक खाते क्रमांक, आधार कार्ड तपशील इ. तसंच, ज्या नामनिर्देशित व्यक्तीला तुम्हाला विम्याच्या रकमेचा लाभार्थी बनवायचं आहे, त्याचं नावही त्यात टाकावं लागेल.
प्रीमियम भरा : योजनेअंतर्गत वार्षिक प्रीमियम फक्त 436 रुपये आहे, जो दरवर्षी तुमच्या बँक खात्यातून आपोआप डेबिट होईल. तुम्ही तुमच्या बँक खात्यात पुरेसा निधी असल्याची खात्री करणं आवश्यक आहे, जेणेकरून योजनेचा प्रीमियम वेळेवर कट होईल.
पॉलिसीचं नूतनीकरण : ही योजना दरवर्षी 1 जून ते 31 मे पर्यंत वैध असते. तुम्हाला योजना चालू ठेवायची असल्यास, प्रीमियम दरवर्षी 31 मे पूर्वी भरावा लागेल. प्रीमियम पेमेंट बँकेद्वारे आपोआप कापलं जाईल. त्यामुळं तुम्हाला कोणतीही अतिरिक्त प्रक्रिया करावी लागणार नाही.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया : तुमच्याकडं इंटरनेट बँकिंग किंवा मोबाइल बँकिंग सुविधा असल्यास, तुम्ही तेथूनही प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी अर्ज करू शकता. यासाठी प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही (https://www.jansuraksha.gov.in/Default.aspx) या वेबसाईटला भेट देऊ शकता.
- लॉग इन : तुम्ही इंटरनेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंग ॲपवर लॉग इन करा.
- विमा पर्यायांवर जा : बँकिंग पोर्टलमध्ये ‘प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना’ हा पर्याय निवडा.
- फॉर्म भरा आणि सबमिट करा : अर्जामध्ये आवश्यक माहिती भरून सबमिट करा. यानंतर बँक तुमच्या खात्यातून प्रीमियमची रक्कम कापून घेईल.
योजनेचे मुख्य मुद्दे :
- ॲश्युअर्ड : योजनेअंतर्गत, विमाधारकाच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाईकाला व्यक्तीला 2 लाख रुपये दिले जातात.
- प्रिमियम : यासाठी तुम्हाला वार्षिक 436 रुपये प्रीमियम भरावा लागतो.
- नूतनीकरण : या योजनेचं दरवर्षी नूतनीकरण केलं जातं. तुम्ही वयाची 50 वर्षे पूर्ण करेपर्यंत योजना सुरू राहते.
- नामांकन : तुम्ही तुमच्या पसंतीच्या कोणत्याही व्यक्तीला विम्याचा लाभार्थी बनवू शकता.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही एक स्वस्त आणि साधी जीवन विमा योजना आहे. जी सामान्य नागरिकांना संरक्षण प्रदान करते. या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. तसंच बँकेद्वारे ऑनलाइन किंवा ऑफलाइन तुम्ही अर्ज करू शकता.
'हे' वाचलंत का :
- गुगलनं युवजरसाठी लाँच केलं 'हे; अप्रतिम फीचर, जाणून घ्या काय आहे खास - Google Gemini Live Feature Launch
- Citroen C3 Aircross ची नव्या लुकसह दमदार एंन्ट्री, इंजिनसह केला नावात बदल - Citroen C3 Aircross
- सॅमसंग, वनप्लससह ऑक्टोबरमध्ये लॉन्च होणार 'हे' स्मार्टफोन, पाहा यादी - New smartphone launched in October