नवी दिल्ली Mahatma Gandhi Jayanti 2024 : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशभरात त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. आज सकाळीच राजघाटावर विविध पक्षातील मान्यवरांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीपुढं नतमस्तक होत आदरांजली अर्पण केली. देशाचे माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांनाही विजयघाटावर मान्यवरांनी आदरांजली अर्पण केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जयदीप धनखड, लोकसभा अधयक्ष ओम बिर्ला, पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी आदरांजली वाहिली.
#WATCH | Delhi: President Droupadi Murmu pays tributes to Mahatma Gandhi on the occasion of his birth anniversary, at Rajghat.
— ANI (@ANI) October 2, 2024
(Source: DD) pic.twitter.com/VqhYKkGJwA
#WATCH | Delhi: President Droupadi Murmu pays tribute to former PM Lal Bahadur Shastri at Vijay Ghat on his birth anniversary. pic.twitter.com/PYhrht3eSu
— ANI (@ANI) October 2, 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली आदरांजली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी राजघाट इथं जात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल माध्यमांवरही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. " देशातील नागरिकांच्या वतीनं जयंतीनिमित्त परमपूज्य बापूंना शतशत नमन. सत्य, सद्भाव आणि समानतेवर आधारित त्यांचं जीवन आदर्श देशातील नागरिकांसाठी सदैव प्रेरणा बनून राहो," अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांनाही आदरांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी सोशल माध्यमांवर, "देश, जवान आणि शेतकऱ्यांसाठी आपलं जीवन समर्पित करणाऱ्या माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांना त्यांच्या जयंतीदिनी विनम्र श्रद्धांजली."
#WATCH | Delhi: PM Narendra Modi pays tributes to Mahatma Gandhi on the occasion of his birth anniversary, at Rajghat. pic.twitter.com/fKz6Pg3smt
— ANI (@ANI) October 2, 2024
उपराष्ट्रपती, ओम बिर्ला, राहूल गांधी आदींसह मान्यवरांनी वाहिली आदरांजली : आज सकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जयदीप धनखड, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, विरोधी पक्षनेते राहूल गांधी, यांच्यासह दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी मार्लेना, नायब राज्यापाल आदींनी आदरांजली वाहिली. त्यासह देशभरात आज महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहाद्दीर सास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी आदरांजली वाहून विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे.
#WATCH | Delhi: Vice President Jagdeep Dhankhar pays tribute to former PM Lal Bahadur Shastri at Vijay Ghat on his birth anniversary. pic.twitter.com/e15qPBtDBJ
— ANI (@ANI) October 2, 2024
#WATCH | Delhi: Lok Sabha Speaker Om Birla pays tribute to former PM Lal Bahadur Shastri at Vijay Ghat on his birth anniversary. pic.twitter.com/Z2faWkaKIM
— ANI (@ANI) October 2, 2024
हेही वाचा :
- Gandhi Jayanti 2023 : महात्मा गांधींच्या सूचनेनुसार वाराणशीत बांधण्यात आलं होत मंदिर, 'या' मंदिराची खासियत पाहून मिळतो सर्वधर्मभावाचा संदेश
- Mahatma Gandhi Jayanti २०२३ : महात्मा गांधींना रामकुंडात तीन वेळा मारावी लागली होती डुबकी; 'हे' आहे कारण
- Gandhi Jayanti 2023 : 'या' ठिकाणी आजही आहे गांधीजींचा चरखा, अनेकांना मिळतो रोजगार