ETV Bharat / state

मतदान केंद्रांवर आकर्षक सेल्फी बूथ, मात्र मोबाईल नेण्यास बंदी; महिलांसाठी खास पिंक केंद्र - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

मतदान केंद्रांवर सेल्फी पॉईंट तयार करण्यात आलेत. मतदान केंद्रावर मोबाईल नेण्यास परवानगी नसताना सेल्फी कशी घ्यायची? अशी कुजबूज सध्या मुंबईकर मतदारांमध्ये आहे.

maharashtra assembly election 2024
मतदान केंद्रावरील तयारी (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 19, 2024, 7:24 PM IST

Updated : Nov 19, 2024, 9:17 PM IST

मुंबई – बुधवारी 20 नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाने मुंबई महापालिकेला दिल्याने आता पालिकेने सर्व तयारी पूर्ण केलीय. पालिका आणि निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील एकूण 36 विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण 420 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, 1 कोटी 2 लाख 29 हजार 708 मतदार हे मुंबईतील 420 मतदारांचे भवितव्य ठरवणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे मतदारांना मतदान केंद्रावर मोबाईल नेण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र, मतदान केंद्रांवर सेल्फी पॉईंट तयार करण्यात आलीत. मतदान केंद्रावर मोबाईल नेण्यास परवानगी नसताना सेल्फी कशी घ्यायची? अशी कुजबूज सध्या मुंबईकर मतदारांमध्ये आहे.

मतदान केंद्रांवर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात : महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी 20 नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. मात्र, त्यापूर्वी 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी गृह मतदान पार पडलंय. यात मुंबईतील 6 हजार 272 ज्येष्ठ नागरिकांनी गृह मतदानाचा हक्क बजावल्याचे पालिकेने म्हटलंय. सोबतच बुधवारी 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या प्रत्यक्ष मतदानासाठी मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांमध्ये दहा हजार 117 मतदान केंद्र उभारण्यात आल्याची माहिती देखील पालिकेने दिलीय. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी एकूण 46 हजार 816 कर्मचारी तैनात करण्यात आले असून, बंदोबस्तासाठी एकूण 25 हजार 696 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिलीय.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसोबत संवाद साधताना प्रतिनिधी (ETV Bharat Reporter)

23 हजार 927 दिव्यांग मतदार : मुंबईत एकूण 76 संवेदनशील मतदान केंद्र असून, त्या मतदान केंद्रांवर विशेष काळजी घेण्यात आलीय. यावर्षी निवडणूक आयोग आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या प्रयत्नाने काही प्रयोगदेखील करण्यात आले असून, मतदान केंद्रांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी या मतदान केंद्रांची मदत होणार आहे, अशी एकूण 84 मॉडेल मतदान केंद्र तयार करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिलीय. या मॉडेल मतदान केंद्रांमुळे मतदान केंद्रांवर हो णारी गर्दी, मतदानासाठी लागणारा वेळ हे सर्व टाळण्यासाठी याचा त्याची मदत होणार आहे. निवडणूक आयोग आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार, मुंबईत एकूण 1 कोटी 2 लाख 29 हजार 708 मतदार असून, यात 54 लाख 68 हजार 361 पुरुष मतदार, 47 लाख 61 हजार 265 महिला मतदार आणि 1 हजार 82 तृतीयपंथी मतदार आहेत. यात 23 हजार 927 दिव्यांग मतदार देखील आहेत. या सर्व मतदारांना सुरळीत मतदान करता यावे यासाठी एकूण 14 हजार 172 ईव्हीएम बॅलेट युनिट, 12 हजार 120 कंट्रोल युनिट, 13 हजार 131 व्हीव्हीपॅट मशीन मतदान केंद्रांवर पोहोचवण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिलीय.

महिलांसाठी खास पिंक मतदान केंद्र : यावर्षी पहिल्यांदाच काही मतदान केंद्रांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर काही बदल करण्यात आले असून, मतदान केंद्रावर आल्यावर मतदारांचा होणारा गोंधळ, यादीत नाव शोधणे, रांगेत उभे राहणे आणि मतदानासाठी लागणाऱ्या वेळ हे टाळण्यासाठी या मतदान केंद्रांचा उपयोग होणार असल्याचा विश्वास कुलाबा विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी महादेव किरवळे यांनी व्यक्त केलाय. किरवळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे बदल प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आले असून, यासाठी मतदारांना निवडणूक आयोगतर्फे जी स्लिप देण्यात आलीय, त्या स्लिपच्या मागे एक कलर दिलाय. संबंधित मतदान केंद्रावर जेव्हा मतदार जाईल तेव्हा त्या कलरचे कार्पेट मतदाराला दिसेल. त्या मतदाराने आपल्या स्लिपवर असलेल्या कलरच्या कार्पेटवर चालायचे जेणेकरून मतदाराला आपला पोलिंग बूथ मतदान केंद्रावर आल्यानंतर शोधाशोध करावी लागणार नाही. सोबतच महिलांसाठी खास पिंक मतदान केंद्रदेखील सुरू करण्यात आल्याचे किरवळे यांनी सांगितलंय. या मतदान केंद्रांवर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांपासून ते निवडणूक कर्मचाऱ्यांपर्यंत सर्व महिला असणार आहेत.

मोबाईल न घेता सेल्फी कसा घ्यायचा? : विशेष म्हणजे मतदारांना बुधवारी मतदानासाठी बाहेर पडताना आपला मोबाईल घरीच ठेवावा लागणार आहे. मतदान केंद्राच्या 100 मीटर आत मोबाईल देण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र, मतदान केंद्रांवर निवडणूक आयोगाने सेल्फी पॉईंट उभारले असल्याने मोबाईल न घेता सेल्फी कसा घ्यायचा? अशी कुजबूज सध्या मुंबईतील मतदारांमध्ये आहे. या संदर्भात आम्ही प्रशासनाला विचारले असता याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आलंय.

हेही वाचाः

  1. नालासोपाऱ्यात बहुजन विकास आघाडी आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा; पैसे वाटल्याचा आरोप, विनोद तावडेंना घेरलं
  2. अनिल देशमुख यांच्या वाहनावर 'इतक्या' जणांनी केलीदगडफेक; नारे लावत गेले निघून, तक्रारीत नमूद केला 'हा' घटनाक्रम

Last Updated : Nov 19, 2024, 9:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.