ETV Bharat / technology

मतदान कार्ड हरवलंय?, 'हे' 12 प्रकारचे पुरावे दाखवून करा मतदान - MAHARASHTRA VIDHAN SABHA NIVADNUK

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानासाठी 12 प्रकारचे पुरावे ग्राह्य धरण्यात येणार आहेत. ते कोणते पुरावे आहेत पाहूयात....

Maharashtra Assembly Election
मतदार (Etv Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Nov 19, 2024, 7:30 PM IST

मुंबई : विधानसभा निवडणूक मतदानाला अवघे काही तास शिल्लक आहेत. राज्यात 288 जांगावर उद्या मतदान पार पडणार आहे. त्यामुळं मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तुमच्याकडं ओळखपत्र असणं गरजेचं आहे. मतदान कार्डशिवाय मतदानापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून निवडणूक आयोगानं 12 प्रकारचे पुरावे मतदान करताना ग्राह्य धरले जाणार असल्याची माहिती दिलीय.

मतदानासाठी बारा पर्याय : मतदान करताना तुमच्याकडं निवडणूक आयोगाचं मतदार ओळखपत्र नसलं, तरी मतदारांना आपली ओळख पटवण्यासाठी आयोगानं बारा पर्याय दिले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मतदान केंद्रावर आधार कार्डासह अकरा प्रकारच्या कागदपत्रांच्या आधारे मतदारांना मतदान करता येणार आहे. त्यामुळं मतदारांकडं मतदान कार्ड नसलं तरी चिंता करण्याची गरज नाहीय.

कोणताही एक पुरावा धरणार ग्राह्य : 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदार फोटो ओळखपत्रांव्यतिरिक्त 12 प्रकारचे ओळख पुरावे स्वीकारले जातील, असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार, 12 प्रकारच्या ओळख पुराव्यापैकी कोणतेही एक पुरावा दाखवल्यानंतर मतदान करता येईल. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, ज्या मतदारांकडं छायाचित्रित मतदार ओळखपत्र आहे, ते मतदार ओळखपत्र दाखवून मतदान केंद्रावर मतदान करतील. ज्या मतदारांना छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करता येणार नाही, त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त 12 पुराव्यापैकी कोणताही एक पुरावा घरात स्वीकारला जाईल.

हे आहेत बारा पुरावे : 12 प्रकारच्या पुराव्यांमध्ये आधार कार्ड, मनरेगा अंतर्गत जारी केलेले रोजगार ओळखपत्र, बँक किंवा पोस्ट विभागानं जारी केलेले छायाचित्र असलेलं पासबुक, कामगार मंत्रालयानं जारी केलेलं आरोग्य बीमा स्मार्ट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, राष्ट्रीय स्मार्ट कार्ड, पासपोर्ट, पेन्शन दस्तऐवज यांचा समावेश आहे. भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि लोकसंख्या नोंदणी अंतर्गत जनगणना आयुक्त, केंद्र किंवा राज्य सरकार, तसंच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, मर्यादित कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिलेली सार्वजनिक छायाचित्र ओळखपत्रं, संसदेच्या सदस्यांना जारी केलेली अधिकृत ओळखपत्रं, विधानसभा, विधानसभा परिषद, भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयानं दिव्यांग व्यक्तींना दिलेली विशेष ओळखपत्रं मतदानासाठी विचारात घेतले जातील. अनिवासी भारतीयांना त्यांची ओळख सिद्ध करण्यासाठी त्यांच्या मूळ पासपोर्टची आवश्यकता असेल.

जुन्या ओळखपत्रावर करा मतदान : एखाद्या मतदारानं मतदार यादीत आपला पत्ता बदलला असेल, परंतु त्याला अद्याप नवीन ओळखपत्र मिळालं नसेल, तर पूर्वीचं ओळखपत्र स्वीकारलं जाईल. परंतु त्या व्यक्तीचं नाव सध्याच्या पत्त्यासह मतदार यादीत असणं आवश्यक आहे. तसंच सर्व नोंदणीकृत मतदारांना मतदानाच्या तारखेच्या किमान पाच दिवस अगोदर मतदान केंद्र, यादीचा भाग क्रमांक, मतदानाची तारीख, वेळ इत्यादी माहितीचे वितरण निवडणूक कार्यालयाकडून करण्यात येइल, असं आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं केले आहे. मतदारांनी मतदान केंद्रावर जाताना त्यांची मतदार माहिती स्लिप आणि फोटो ओळखपत्र सोबत आणावे, असं अवाहन आयोगानं केलंय.

'हे' वाचलंत का :

  1. रस्त्यावर आढळली शेकडो मतदान कार्ड; बनावट असल्याचा संशय, गुन्हा दाखल - loksabha election 2024
  2. राज्यात अनेकांची नावं मतदार यादीतून गायब, निवडणूक आयोगानं आरटीआयमध्ये काय दिली आहेत कारणे? - Lok Sabha Election 2024
  3. पालघरमध्ये मतदानादिवशी मतदारांचे हाल; लाखो लोकांची नावं मतदार यादीतून गायब, राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप - Palghar Lok Sabha

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.