माद्रिद - अर्जेंटीनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचा बार्सिलोना फुटबॉल क्लबसोबतचा प्रवास संपला आहे. स्वत: बार्सिलोना फुटबॉल क्लबने यासंबंधी माहिती दिली आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून मेस्सी बार्सिलोना क्लब सोडणार अशी चर्चा होती. आता क्लबनेच जाहीर केलेले असल्याने यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
यासंबंधी माहिती देताना बार्सिलोना फुटबॉल क्लबने सांगितलं की, बार्सिलोना फुलबॉल क्लब आणि लिओनेल मेस्सी यांच्यात करारासंदर्भात बोलणं झालं होतं. यात दोघांचीही करारावर स्वाक्षरी करण्यास सहमती होती. परंतु आर्थिक आणि पायाभूत सुविधांच्या अडचणींमुळे हे शक्य होऊ शकलं नाही. यामुळे मेस्सी बार्सिलोना फुटबॉल क्लबचा भाग असणार नाही.
बार्सिलोना फुटबॉल क्लब आणि आणि लियोनेल मेस्सीची इच्छा पूर्ण झाली नाही, याचं आम्हाला दु:ख आहे. त्यानं क्लबसाठी दिलेल्या योगदानांसाठी खूप खूप धन्यवाद. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, अशा शब्दात बार्सिलोना क्बलने मेस्सीला शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, लिओनेल मेस्सी वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी बार्सिलोना फुटबॉल क्लबसोबत जोडला गेला होता. तेव्हा जवळजवळ आपल्या कारकिर्दीतील २१ वर्षे बार्सिलोना फुटबॉल क्लबसोबत घालवली. आता त्याला या संघाची साथ सोडावी लागली आहे.
हेही वाचा - Tokyo Olympic : बजरंग पुनिया प्रतिस्पर्धीला धूळ चारत उपांत्य फेरीत
हेही वाचा - Tokyo Olympics : रणरागिणी अखेरपर्यंत लढल्या! महिला हॉकी संघाचे कास्य पदकाचे स्वप्न भंगले