मुंबई - कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने ब्राझीलचा पराभव करत विजेतेपद पटकावले. यासोबतच अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचे आपल्या संघाला विजेतेपद मिळवून देण्याचे स्वप्नही साकार झाले. विजयानंतर मेस्सी आणि त्याचे सहकारी खेळाडू सेलिब्रेशन करत होते. त्यावेळी तिथे ब्राझीलचा स्टार खेळाडू नेमार पोहोचला. तेव्हा मेस्सीने नेमारची गळाभेट घेतली. या भावनिक क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
-
#CopaAmérica 🏆
— Copa América (@CopaAmerica) July 11, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
¡A los pies de la copa! Enorme festejo del plantel argentino con su gente 🇦🇷
🇦🇷 Argentina 🆚 Brasil 🇧🇷#VibraElContinente #VibraOContinente pic.twitter.com/Sgr48GOBkR
">#CopaAmérica 🏆
— Copa América (@CopaAmerica) July 11, 2021
¡A los pies de la copa! Enorme festejo del plantel argentino con su gente 🇦🇷
🇦🇷 Argentina 🆚 Brasil 🇧🇷#VibraElContinente #VibraOContinente pic.twitter.com/Sgr48GOBkR#CopaAmérica 🏆
— Copa América (@CopaAmerica) July 11, 2021
¡A los pies de la copa! Enorme festejo del plantel argentino con su gente 🇦🇷
🇦🇷 Argentina 🆚 Brasil 🇧🇷#VibraElContinente #VibraOContinente pic.twitter.com/Sgr48GOBkR
मार्काना स्टेडियममध्ये अर्जेटिना आणि ब्राझील या दोन तुल्यबळ संघांमध्ये कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. अर्जेंटिनाने या सामन्यात १-० ने ब्राझीलला नमवत विजेतेपद पटकावले. अर्जेंटिनाकडून एंजल डी. मारिया याने एकमेव गोल केला. तब्बल २८ वर्षांनंतर कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळाल्याने अर्जेटिनाच्या खेळाडूंचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्यामुळे खेळाडू मोठ्या उत्साहात सेलिब्रेशन करत होते.
-
#CopaAmérica 🏆
— Copa América (@CopaAmerica) July 11, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
¡LO LINDO DEL FÚTBOL! Emotivo abrazo entre Messi 🇦🇷 y Neymar 🇧🇷 ¡ÍDOLOS!
🇦🇷 Argentina 🆚 Brasil 🇧🇷#VibraElContinente #VibraOContinente pic.twitter.com/ecknhlv2VI
">#CopaAmérica 🏆
— Copa América (@CopaAmerica) July 11, 2021
¡LO LINDO DEL FÚTBOL! Emotivo abrazo entre Messi 🇦🇷 y Neymar 🇧🇷 ¡ÍDOLOS!
🇦🇷 Argentina 🆚 Brasil 🇧🇷#VibraElContinente #VibraOContinente pic.twitter.com/ecknhlv2VI#CopaAmérica 🏆
— Copa América (@CopaAmerica) July 11, 2021
¡LO LINDO DEL FÚTBOL! Emotivo abrazo entre Messi 🇦🇷 y Neymar 🇧🇷 ¡ÍDOLOS!
🇦🇷 Argentina 🆚 Brasil 🇧🇷#VibraElContinente #VibraOContinente pic.twitter.com/ecknhlv2VI
अर्जेंटिनाचा संघ सेलिब्रेशन करत असताना ब्राझीलचा स्टार खेळाडू नेमार तिथे पोहोचला. नेमारला पाहून मेस्सी तिथे आला आणि त्याने नेमारची गळाभेट घेतली. मेस्सीने नेमारचे सांत्वन केलं, तर नेमारने मेस्सीचे विजयासाठी अभिनंदन केलं. मेस्सी-नेमार यांच्या चाहत्यांसाठी हा भावनिक क्षण ठरला. मेस्सी नेमारच्या या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, नेमार मेस्सीचा बार्सिलोना क्लबमधील जुना सहकारी आहे. दोघांनी बार्सिलोना क्लबकडून एकत्र सामने खेळली आहेत.
हेही वाचा - विम्बल्डनला मिळाली नवी विजेती; ऑस्ट्रेलियाच्या अॅश्ले बार्टीने इतिहास घडवला