ETV Bharat / sports

ISL FINAL : एटीके एफसी आणि चेन्नई एफसी यांच्यात रंगणार द्वंद्व - चेन्नई वि. एटीके आयएसएल फायनल २०२० न्यूज

एटीकेने उपांत्य सामन्यात गतविजेत्या बंगळुरू एफसीचा पराभव केला. तर चेन्नई एफसीने एफसी गोव्याला हरवून तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. लीगच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरीत दोन्ही क्लब समोरासमोर उभे आहेत.

Chennai and ATK FC to clash for their third title in isl final
ISL FINAL : एटीके एफसी आणि चेन्नई एफसी यांच्यात रंगणार द्वंद्व
author img

By

Published : Mar 14, 2020, 7:25 AM IST

गोवा - हीरो इंडियन सुपर लीगचा (आयएसएल) सहावा हंगाम आज संपणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना आज शनिवारी जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर क्लब-एटीके एफसी आणि चेन्नई एफसी यांच्यात खेळवला जाईल. हो दोन्ही संघ आपापल्या तिसर्‍या विजेतेपदासाठी एकमेंकासमोर उभे ठाकतील. कोरोना व्हायरसच्या धास्तीमुळे हा सामना प्रेक्षकांशिवाय खेळवला जाणार आहे.

  • Official statement: Hero ISL Final to be held behind closed doors.

    Decision taken in view of the health and safety of players fans and staff.

    Further details to follow shortly.

    — Indian Super League (@IndSuperLeague) March 12, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - भारत वि. दक्षिण आफ्रिका मालिका रद्द!

एटीकेने उपांत्य सामन्यात गतविजेत्या बंगळुरू एफसीचा पराभव केला. तर चेन्नई एफसीने एफसी गोव्याला हरवून तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. लीगच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरीत दोन्ही क्लब समोरासमोर उभे आहेत. विशेष म्हणजे, अंतिम फेरी गाठल्यानंतर दोघेही संघ एकदाही हरलेले नाहीत.

'आम्हाला अंतिम सामन्याचा आनंद घ्यावा लागेल आणि तो विजयासह घ्यावा लागेल. विरोधी संघालाही सन्मानित करावे लागेल. आमची उपयुक्तता सिद्ध करण्यासाठी आमच्याकडे ९० मिनिटे असतील. आपल्या संपूर्ण कारकीर्दीत कोणत्याही खेळाडूला पुन्हा आयएसएल फायनल खेळण्याची संधी मिळणार नाही हे या खेळाडूंनी लक्षात ठेवलं पाहिजे', असे २०१४ मध्ये एटीकेला विजेतेपद मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावलेले प्रशिक्षक एंटोनियो हाबास यांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.