लुधियाना - सर्व्हिसेस(सेनादल) फुटबॉल संघाने संतोष ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पंजाबला 1-0 ने मात देत विजेतेपद आपल्या नावावर केले आहे. या स्पर्धेतील सर्व्हिसेस संघाचे हे सातवे जेतेपद ठरले आहे. उपांत्य फेरीत पंजाबने गोव्याला तर सर्व्हिसेसने कर्नाटकला पराभुत करत अंतिम फेरीत धडक मारली होती .
अंतिम सामन्यात सर्व्हिसेस संघासाठी बिकास थापाने ६१ व्या मिनीटाला एकमेव गोल केला. सर्व्हिसेसचे जोरदार आक्रमण आणि भक्कम बचावासमोर पंजाबच्या संघाला एकही गोल करता आला नाही.
-
🏆🏆🏆CHAMPIONS🏆🏆🏆
— Indian Football Team (@IndianFootball) April 21, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Services lift the #HeroSantoshTrophy 🏆 for the 6️⃣th time🙌🏽#PUNSER #IndianFootball #HeroSantoshTrophyFinal @HeroMotoCorp pic.twitter.com/WI187u6r2L
">🏆🏆🏆CHAMPIONS🏆🏆🏆
— Indian Football Team (@IndianFootball) April 21, 2019
Services lift the #HeroSantoshTrophy 🏆 for the 6️⃣th time🙌🏽#PUNSER #IndianFootball #HeroSantoshTrophyFinal @HeroMotoCorp pic.twitter.com/WI187u6r2L🏆🏆🏆CHAMPIONS🏆🏆🏆
— Indian Football Team (@IndianFootball) April 21, 2019
Services lift the #HeroSantoshTrophy 🏆 for the 6️⃣th time🙌🏽#PUNSER #IndianFootball #HeroSantoshTrophyFinal @HeroMotoCorp pic.twitter.com/WI187u6r2L
२०१५ मध्ये संतोष ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातही सर्व्हिसेस आणि यजमान पंजाब संघ जेतेपदासाठी भिडले होते. त्या सामन्यातही पेनाल्टी शूटआऊटमध्ये पंजाबला 5-4 ने पराभवाल सामोरे जावे लागले होते.
संतोष ट्राफी २०१९ मध्ये सर्व्हिसेसचा संघ अपराजीत राहिला आहे. या मोसमात कोणत्याही संघाला सर्व्हिसेसच्या संघाचा पराभव करता आला नाही.