ETV Bharat / sports

ला-लीगामध्ये बार्सिलोनाची मालोर्कावर 4-0ने मात

उजव्या पायाला मेस्सीला दुखापत झाली होती. मात्र, मेस्सीने सामन्यात संपूर्ण योगदान दिले. बार्सिलोनाकडून एट्रो विडाल (दुसर्‍या मिनिटाला) आणि मार्टिन ब्रेथवेट (37 व्या) यांनी सामन्याच्या पूर्वार्धात गोल केला. मेस्सीने ब्रेथवेटला गोल करण्यास सहाय्य केले. गोल केल्यानंतर या खेळाडूंनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन केले नाही.

Barcelona fc defeat mallorca in la liga 2020
ला-लीगामध्ये बार्सिलोनाची मालोर्कावर 4-0ने मात
author img

By

Published : Jun 14, 2020, 4:33 PM IST

माद्रिद - तीन महिन्याच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर मैदानावर परतलेल्या बार्सिलोना संघाने विजयारंभ केला. स्पॅनिश फुटबॉल लीग ला लीगाच्या सामन्यात बार्सिलोनाने मालोर्काला 4-0 असे पराभूत केले.

उजव्या पायाला मेस्सीला दुखापत झाली होती. मात्र, मेस्सीने सामन्यात संपूर्ण योगदान दिले. बार्सिलोनाकडून एट्रो विडाल (दुसर्‍या मिनिटाला) आणि मार्टिन ब्रेथवेट (37 व्या) यांनी सामन्याच्या पूर्वार्धात गोल केला. मेस्सीने ब्रेथवेटला गोल करण्यास सहाय्य केले. गोल केल्यानंतर या खेळाडूंनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन केले नाही.

आरोग्याच्या कारणांमुळे, हा सामना प्रेक्षकांशिवाय खेळला गेला. परंतु असे असूनही, दुसर्‍या सत्रात एक व्यक्ती मैदानावर पोहोचला. यानंतर सुरक्षा कर्मचार्‍यांनी त्याला बाहेर काढले. काही मीटर अंतरावरुन त्याने बार्सिलोनाच्या जॉर्डी अल्बासोबत सेल्फी काढला. दुसऱ्या सत्रात जोर्डी अल्बा (79 व्या मिनिटाला) आणि मेस्सीने अतिरिक्त वेळेत गोल करत सामना खिशात घातला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.