वॉशिंग्टन - मेजर लीग सॉकरमध्ये (एमएलएस) 18 खेळाडू आणि सहा क्रीडा कर्मचारी कोरोनाबाधित आढळले आहेत. ऑर्लँडोला रवाना होण्यापूर्वी या सर्वांची कोरोना चाचणी झाली होती. जून सुरू झाल्यानंतर आतापर्यंत एकूण 668 खेळाडूंची चाचणी घेण्यात आली आहे, असे एमएलएसने सांगितले.
ही स्पर्धा 8 जुलैपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेतील संघांनी 4 जूनपासून प्रशिक्षण सुरू केले. लीगच्या सर्व 26 संघांपैकी 25 संघांनी आधीच प्रशिक्षण सुरू केले होते. एमएलएसने म्हटले आहे, की सर्व खेळाडू, प्रशिक्षक, रेफरी आणि क्लबच्या कर्मचार्यांना आर्लँडोला जाण्यापूर्वी 24 तासांच्या आत दोनदा चाचणी घेणे आवश्यक आहे.
कोरोना व्हायरस साथीच्या रोगामुळे लीग 12 मार्च पासून पुढे ढकलण्यात आली होती. तब्बल 180 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत असून, आतापर्यंत 54 लाख 53 हजार 247 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 5 लाख 626 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.