ETV Bharat / sports

WTC Final : न्यूझीलंड खेळाडूला शिवीगाळ, प्रेक्षकांवर कारवाई

आयसीसीने एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, आम्हाला माहिती मिळाली की, न्यूझीलंडच्या खेळाडूंबद्दल प्रेक्षकांनी अपशब्द वापरले. आमच्या सुरक्षारक्षकांनी त्या प्रेक्षकांची ओळख पटवली आणि त्या प्रेक्षकांना मैदानाबाहेर काढलं. आम्ही क्रिकेटमध्ये अशा प्रकारच्या अपमानजनक वर्तनाचा स्विकार करणार नाही.

WTC Final, Day 5: Fans Ejected At World Test Championship Final For Abusing New Zealand Players
author img

By

Published : Jun 23, 2021, 3:42 PM IST

साउथम्पटन - भारत आणि न्यूझीलंड यांच्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना साउथम्पटनमध्ये खेळला जात आहे. सामन्याच्या पाचव्या दिवशी दोन प्रेक्षकांनी न्यूझीलंडच्या खेळाडूंविषयी अपशब्द वापरले. तेव्हा मैदानावर तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांनी त्या प्रेक्षकांनी मैदानाबाहेर काढलं. आयसीसीने याबद्दलची माहिती दिली आहे.

आयसीसीने एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, आम्हाला माहिती मिळाली की, न्यूझीलंडच्या खेळाडूंबद्दल प्रेक्षकांनी अपशब्द वापरले. आमच्या सुरक्षारक्षकांनी त्या प्रेक्षकांची ओळख पटवली आणि त्या प्रेक्षकांना मैदानाबाहेर काढलं. आम्ही क्रिकेटमध्ये अशा प्रकारच्या अपमानजनक वर्तनाचा स्विकार करणार नाही.

हेही वाचा - WTC Final: मोहम्मद शमी भरमैदानात टॉवेलमध्ये; चाहते म्हणाले, आता लुंगी डान्स होईल

एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, ब्लॉक एममध्ये बसलेल्या प्रेक्षकांनी न्यूझीलंडच्या खेळाडूंविषयी अपशब्द वापरले. या ब्लॉकच्या खाली हॉटेल असून यात खेळाडू उतरले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, न्यूझीलंडचा अनुभवी खेळाडू रॉस टेलरविषयी प्रेक्षकांनी अपशब्द वापरले.

हेही वाचा - VIDEO: षटकार खेचल्यानंतर फलंदाजावरच आली डोक्याला हात लावून घेण्याची वेळ

दरम्यान, न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिम साउथीने याविषयी सांगितलं की, आमच्या खेळाडूंना या घटनेविषयी कोणतीही कल्पना नाही. मी ही बाब पहिल्यांदाच ऐकत आहे. मैदानावर सामना खेळभावनेने खेळला जातो. मैदानाबाहेर काय होत याची माहिती आम्हाला नाही, असे साउथी म्हणाला.

हेही वाचा - WTC Final : भारताकडे ३२ धावांची आघाडी, बुधवारी ठरणार जागतीक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा विजेता

हेही वाचा - WTC Final : सेहवागने एका दगडात मारले २ पक्षी मारले, ICCसह टीम इंडियाला धुतलं

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.