ETV Bharat / sports

आम्ही आयपीएल जिंकलो तर डिव्हिलियर्सबद्दल खूप भावनिक होऊ - विराट कोहली

author img

By

Published : Mar 29, 2022, 9:06 PM IST

क्रिकेटच्या महान फलंदाजांपैकी एक असलेल्या डिव्हिलियर्सने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये खेळाच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली. 2011पासून सो RCB सोबत जोडला गेला होता. त्याने आरसीबी फ्रँचायझीसोबत 11 हंगामांचा आनंद लुटला. त्याच्याबद्दल बोलताना विराट कोहलीने एक मोठे वक्तव्य केले आहे.

Kohli
Kohli

मुंबई: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ( Royal Challengers Bangalore ) संघ आयपीएल स्पर्धेत गेल्या चौदा वर्षापासून खेळत आहे. परंतु या संघाला अजून एकदा ही आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरता आलेले नाही. आता पर्यंत या संघाने एक ही ट्रॉफी न जिंकल्याची खंत त्यांच्या मनात आहे. यावर आता आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीने ( Former RCB captain Virat Kohli ) मोठी प्रतिक्रिया दिली आहे. विराट कोहलीला वाटते, जर कधी आगामी सत्रात आरसीबी संघाने विजेतेपद मिळवले, तर सर्वात अगोदर विराट कोहलीला एबी डिविलियर्सची नाव आठवेल. कारण हे विजेतेपद त्याच्यासाठी खुप मायने राखत होते.

It’s not just you fans, even @imVkohli misses @ABDeVilliers17 at RCB, and he opens up about their bond, the memories they’ve shared, and much more, on @KreditBee presents Bold Diaries.#PlayBold #WeAreChallengers #IPL2022 #Mission2022 #RCB #ನಮ್ಮRCB pic.twitter.com/WXNfsqe3L6

— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) March 29, 2022

विराटने (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुच्या बोल्डमध्ये बोलताना म्हणाला की, “मला आठवते, जेव्हा डिविलियर्सने (AB De Villiers) क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला (AB De Villiers IPL Retirement) होता. तेव्हा त्याने मला एक व्हॉईस मॅसेज पाठवला होता. त्यावेळी मी टी-20 विश्वचषक झाल्यानंतर भारतात परत येत होतो. आम्ही दुबईमध्ये होतो आणि तेव्हा मला त्याचा व्हॉईस मॅसेज मिळाला. अनुष्काही त्यावेळी माझ्यासोबत होती. डिविलियर्सचा मॅसेज ऐकून मी चकित झालो होतो आणि मी अनुष्काकडे पाहात राहिलो.”

विराट म्हणाला, मला मागील आयपीएलपासूनच या गोष्टीचा अंदाज येत होता. कारण डिविलियर्स सतत माझ्याशी बोसताना निवृत्तीबद्दल बोलायचा. तो मला म्हणत असे की, मला तुला असेच एका दिवशी कॉफीसाठी भेटायचे आहे. मी सध्या खूप नर्वस होत आहे. यावरून मला अंदाज आला होता की, काहीतरी होणार आहे. परंतु मी त्याला या विषयावर बोलायला गेलो की, तो विषय नेहमी टाळायचा. पण नंतर अचानक त्याच्या या निर्णयाबद्दल ऐकून मी खूप भावूक झालो होतो. माझ्या खूप साऱ्या आठवणी त्याच्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. आम्ही अनेक चढ-उतार एकत्र पाहिले आहेत. तो प्रत्येकवेळी माझ्यासोबत राहिला आहे.

हेही वाचा - Women's Odi Rankings: आयसीसीकडून महिला खेळाडूंची वनडे क्रमवारी जाहीर; मिताली झुलन यांना क्रमवारीत फायदा

मुंबई: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ( Royal Challengers Bangalore ) संघ आयपीएल स्पर्धेत गेल्या चौदा वर्षापासून खेळत आहे. परंतु या संघाला अजून एकदा ही आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरता आलेले नाही. आता पर्यंत या संघाने एक ही ट्रॉफी न जिंकल्याची खंत त्यांच्या मनात आहे. यावर आता आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीने ( Former RCB captain Virat Kohli ) मोठी प्रतिक्रिया दिली आहे. विराट कोहलीला वाटते, जर कधी आगामी सत्रात आरसीबी संघाने विजेतेपद मिळवले, तर सर्वात अगोदर विराट कोहलीला एबी डिविलियर्सची नाव आठवेल. कारण हे विजेतेपद त्याच्यासाठी खुप मायने राखत होते.

विराटने (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुच्या बोल्डमध्ये बोलताना म्हणाला की, “मला आठवते, जेव्हा डिविलियर्सने (AB De Villiers) क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला (AB De Villiers IPL Retirement) होता. तेव्हा त्याने मला एक व्हॉईस मॅसेज पाठवला होता. त्यावेळी मी टी-20 विश्वचषक झाल्यानंतर भारतात परत येत होतो. आम्ही दुबईमध्ये होतो आणि तेव्हा मला त्याचा व्हॉईस मॅसेज मिळाला. अनुष्काही त्यावेळी माझ्यासोबत होती. डिविलियर्सचा मॅसेज ऐकून मी चकित झालो होतो आणि मी अनुष्काकडे पाहात राहिलो.”

विराट म्हणाला, मला मागील आयपीएलपासूनच या गोष्टीचा अंदाज येत होता. कारण डिविलियर्स सतत माझ्याशी बोसताना निवृत्तीबद्दल बोलायचा. तो मला म्हणत असे की, मला तुला असेच एका दिवशी कॉफीसाठी भेटायचे आहे. मी सध्या खूप नर्वस होत आहे. यावरून मला अंदाज आला होता की, काहीतरी होणार आहे. परंतु मी त्याला या विषयावर बोलायला गेलो की, तो विषय नेहमी टाळायचा. पण नंतर अचानक त्याच्या या निर्णयाबद्दल ऐकून मी खूप भावूक झालो होतो. माझ्या खूप साऱ्या आठवणी त्याच्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. आम्ही अनेक चढ-उतार एकत्र पाहिले आहेत. तो प्रत्येकवेळी माझ्यासोबत राहिला आहे.

हेही वाचा - Women's Odi Rankings: आयसीसीकडून महिला खेळाडूंची वनडे क्रमवारी जाहीर; मिताली झुलन यांना क्रमवारीत फायदा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.