मुंबई World Cup 2023 : विश्वचषक सामन्यासाठी मुंबईतील वानखेडे मैदान सज्ज झालाय. संपूर्ण देशामध्ये सध्या क्रिकेटविषयी बोलले जातंय. आवडत्या क्रिकेट खेळाडू पासून ते कोणते क्रिकेट मैदानापर्यंत सर्व गोष्टींची चर्चा आपल्या आजूबाजूला रंगताना पाहायला मिळत आहे. मुंबईती वानखेडे मैदानावर क्रिकेट विश्वचषकाचे सामने होणार आहेत. त्यामुळं विश्वचषकासाठी वानखेडे स्टेडियम सज्ज झालंय. या विषयी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांनी ईटीव्ही भारतशी विशेष संवाद साधला.
मुंबईतील वानखेडे मैदान विश्वचषक क्रिकेट सामन्यांसाठी पूर्णपणे सज्ज झालंय. विश्वचषकासाठी मुंबईत विशेष तयारी करण्यात आली आहे. यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशन नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून काळजी घेत आहे. - अमोल काळे, अध्यक्ष मुंबई क्रिकेट असोसिएशन
सर्व सुविधा देण्यासाठी मैदान सज्ज : मुंबई क्रिकेट असोसिएशनने विश्वचषकासाठी गेल्या तीन-चार महिन्यांपासून तयारी सुरू केली होती. क्रिकेट सामना पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अस काळे यांनी म्हटलंय. सर्व सुविधा देण्यासाठी सर्व कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. प्रेस बॉक्ससह अनेक ठिकाणांचं नूतनीकरण करण्यात आल्याचं आमोल काळे यांनी म्हटलंय.
फलंदाजांसाठी अनुकूल खेळपट्टी : वानखेडे स्टेडियमवर पाच सामने होणार आहेत. वानखेडेची खेळपट्टी फलंदाजांसाठी चांगली असल्याचं म्हटलं जातंय. ही खेळपट्टी जास्त धावांसाठीही ओळखली जाते. ही खेळपट्टी फलंदाजांसाठी स्वर्ग तर, गोलंदाजांसाठी दुःस्वप्न मानली जाते. देशातील सर्वात लहान स्टेडियम अशी वानखेडे स्टेडियमची ओळख आहे. त्यामुळं या मैदानात षटकार, चौकारांचा पाऊस पाहायला मिळतो. मुंबई क्रिकेट असोसिएशननं माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा पुतळा बसवण्याची घोषणा केली. त्याचं अनावरण 1 नोव्हेंबर रोजी होणार आहे. भारतात सध्या सुरू असलेला क्रिकेट विश्वचषक क्रिकेट चाहत्यांसाठी ही पर्वणीच आहे. विश्वचषक मालिकेतील सामन्यांदरम्यान मैदानावरील प्रेक्षकांच्या जागा रिकाम्या दिसतात. मात्र, मुंबईतील वानखेडे स्टेडियम त्याला अपवाद ठरेल, असा अंदाज वर्तवण्यात आला असून प्रेक्षकांची गर्दी इतिहास घडवणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा -