वेलिंगटन: सलामीवीर अॅलिसा हिलीचे शतक ( Century of Alyssa Healy ) आणि रेचेल हेन्ससोबतच्या 216 धावांच्या भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाने गुरुवारी वेस्ट इंडिजचा 157 धावांनी पराभव करून आयसीसी महिला वनडे विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. हीलीने 107 चेंडूंत 17 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 129 धावा केल्या. तर हेन्सने 100 चेंडूत 85 धावा केल्या. या दोघांकडून मिळालेल्या शानदार सुरुवातीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला पावसामुळे 45 षटकांत 3 बाद 305 धावांची मोठी मजल मारण्यात यश आले.
-
#TeamAustralia beat West Indies by 157 runs to secure their spot in the #CWC22 final. pic.twitter.com/cKdCNiebn8
— ICC (@ICC) March 30, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#TeamAustralia beat West Indies by 157 runs to secure their spot in the #CWC22 final. pic.twitter.com/cKdCNiebn8
— ICC (@ICC) March 30, 2022#TeamAustralia beat West Indies by 157 runs to secure their spot in the #CWC22 final. pic.twitter.com/cKdCNiebn8
— ICC (@ICC) March 30, 2022
वेस्ट इंडिजचा संघ सुरुवातीपासूनच मोठ्या लक्ष्यासमोर अडखळताना दिसला. तसेच तो कोणत्याही टप्प्यावर ऑस्ट्रेलियन संघाच्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्याच्या स्थितीत दिसला नव्हता. वेस्ट इंडिजला 37 षटकांत केवळ 148 धावाच करता आल्या. कॅरेबियन संघाकडून कर्णधार स्टेफनी टेलरने 48 धावा केल्या, तर तिचे दोन खेळाडू चिनेली हेन्री आणि अनिशा मोहम्मद दुखापतीमुळे फलंदाजीला उतरले नाहीत. सहावेळा चॅम्पियन असलेल्या ऑस्ट्रेलियाचा सातव्या विजेतेपदासाठी अंतिम फेरीत इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्याशी सामना होईल.
-
Australia are through to the #CWC22 final and will look to win their seventh ICC Women's World Cup title 🏆 pic.twitter.com/R5Jb79A8AO
— ICC (@ICC) March 30, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Australia are through to the #CWC22 final and will look to win their seventh ICC Women's World Cup title 🏆 pic.twitter.com/R5Jb79A8AO
— ICC (@ICC) March 30, 2022Australia are through to the #CWC22 final and will look to win their seventh ICC Women's World Cup title 🏆 pic.twitter.com/R5Jb79A8AO
— ICC (@ICC) March 30, 2022
पावसामुळे सामना एक तास ४५ मिनिटे उशिराने सुरू झाला. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकली आणि त्यांनी ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले होते. त्यांचा हा निर्णय हिली आणि हेन्सने चुकीचा सिद्ध केला. हेलीने आपले अर्धशतक पूर्ण केल्यानंतर अधिक आक्रमकता दाखवली आणि त्याच्या पुढील 50 धावा फक्त 28 चेंडूत केल्या. तिने 91 चेंडूत आपले चौथे शतक पूर्ण केले. शमिला कॉनेलने तिला मिडऑफला झेलबाद करून कॅरेबियन गोलंदाजांना दिलासा दिला.
गोलंदाज हेन्रीने हेन्सला शतक पूर्ण करू दिले नाही आणि त्याच षटकात अॅशलेग गार्डनर (12)लाही बाद केले. हेन्सने आपल्या खेळीत नऊ चौकार मारले. या दोघी बाद झाल्यानंतर कर्णधार मेग लॅनिंग (26 चेंडूत नाबाद 26) आणि बेथ मुनी (31 चेंडूत नाबाद 43) यांनी चौथ्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी करून 300 धावांचा टप्पा गाठला.
वेस्ट इंडिजने सलामीवीर रश्दा विल्यम्सची (0) विकेट लवकर गमावली. तिच्यावर डिआंड्रा डॉटिनची जबाबदारी होती पण तिने 34 धावा केल्या आणि अॅनाबेल सदरलँडने लाँग ऑनवर झेलबाद केले. जेसी जॉन्सननेही (14 धावांत 2 बळी) हॅले मॅथ्यूजला (34) चांगल्या सुरुवातीचा फायदा घेऊ दिला नाही. टेलरने डावाची एका बाजू सांभाळली. पण दुसऱ्या बाजूने विकेट पडतच होत्या. टेलरने (48) 75 चेंडूंच्या खेळीत चार चौकार मारले.
संक्षिप्त धावफलक -
ऑस्ट्रेलिया: 305/3 (राशेल हेन्स 85, अॅलिसा हिली 129, मेग लॅनिंग नाबाद 26, बेथ मुनी नाबाद 43; चिन्ले हेन्री 2/51).
वेस्ट इंडिज: 37 षटकांत 148/10 (डिआंड्रा डॉटिन 34, हेली मॅथ्यूज 34, स्टॅफनी टेलर 48; जेस जोनासेन 2/14).