ETV Bharat / sports

Womens T20 Challenge VEL vs SPN : व्हेलॉसिटी संघाने नाणेफेक जिंकली, सुपरनोव्हा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी सज्ज

author img

By

Published : May 24, 2022, 3:59 PM IST

महिला टी-20 चॅलेंजमध्ये ( Womens T20 Challenge ) सुपरनोव्हा आणि व्हेलॉसिटी संघ आमनेसामने आहेत. पुण्यातील MACS स्टेडियमवर या दोघांमध्ये सामना होत आहे. वेलोसिटीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे.

VEL vs SPN
VEL vs SPN

मुंबई: महिला टी-20 चॅलेंजच्या यंदाच्या हंगामातील दुसरा सामना व्हेलॉसिटी विरुद्ध सुपरनोव्हा ( Velocity vs Supernovas ) यांच्यात होणार आहे. या सामन्याला दुपारी साडेतीनला पुण्यातील एमसीए क्रिकेट मैदानावर सुरुवात होणार आहे. दोन्ही संघात नाणेफेक पार पडली आहे. नाणेफेक जिंकून वेलोसिटी संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सुपरनोव्हाजने पहिल्याच सामन्यात ट्रेलब्लेझरचा 49 धावांनी पराभव केला आहे.

व्हेलॉसिटी टीम आज पहिल्यांदाच मैदानात उतरली आहे. व्हेलॉसिटीच्या संघाची कमान दीप्ती शर्माच्या हातात आहे, याआधी संघाची कर्णधार मिताली राज होती. आजचा सामना खूपच रंजक होण्याची अपेक्षा आहे. सुपरनोव्हाजचा हा स्पर्धेतील दुसरा सामना असेल. त्यांनी स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यात ट्रेलब्लेझर्सचा 49 धावांनी पराभव केला. या सामन्यातही त्यांच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असेल.

व्हेलॉसिटी संघाचा सीझनचा पहिला सामना खेळेल. स्पर्धेच्या मागील हंगामात, त्यांनी 2 पैकी 1 सामना जिंकला आणि गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले होते. त्यांचे नेतृत्व भारतीय अष्टपैलू दीप्ती शर्मा करणार असून त्यांच्याकडे अनुभवी संघ आहे. यावेळी मिताली राज आणि झुलन गोस्वामी या खेळाडू या स्पर्धेत खेळत नाहीत. ट्रेलब्लेझर्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात सुपरनोव्हासच्या फलंदाजीने चांगली कामगिरी केली. त्याचबरोबर गोलंदाजीत पूजा वस्त्राकरने दमदार खेळ करताना चार बळी घेतले.

सुपरनोव्हाज (प्लेइंग इलेवन): प्रिया पुनिया, डिआंड्रा डॉटिन, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), सुने लुस, अलाना किंग, पूजा वस्त्राकर, सोफी एक्लेस्टोन, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), मेघना सिंग आणि व्ही चंदू.

वेलॉसिटी (प्लेइंग इलेवन): शफाली वर्मा, लॉरा वोल्वार्ड, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), नथकन चँथम, दीप्ती शर्मा (कर्णधार), किरण नवगिरे, स्नेह राणा, राधा यादव, केट क्रॉस, अयाबोंगा खाका आणि माया सोनवणेटोस.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.