क्राइस्टचर्च : आयसीसी महिला विश्वचषक ( ICC Women's World Cup ) स्पर्धेतील 28 वा सामना भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात पार पडला. या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने तीन विकेट्सनने भारतावर विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली. त्याचबरोबर भारतीय संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 274 धावा केल्या. या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 7 गडी गमावून 275 धावा करत सामना जिंकला.
-
A dramatic finish to yet another #CWC22 thriller with South Africa emerging as victors on the final ball against India ⚡️ pic.twitter.com/ufPw44K4Pv
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) March 27, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">A dramatic finish to yet another #CWC22 thriller with South Africa emerging as victors on the final ball against India ⚡️ pic.twitter.com/ufPw44K4Pv
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) March 27, 2022A dramatic finish to yet another #CWC22 thriller with South Africa emerging as victors on the final ball against India ⚡️ pic.twitter.com/ufPw44K4Pv
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) March 27, 2022
भारत आयसीसी विश्वचषकातून बाहेर ( India out of ICC World Cup ) पडला आहे. दक्षिण आफ्रिकेने हाय व्होल्टेज सामन्यात मिताली राजच्या संघाचा 3 गडी राखून पराभव करून त्यांना स्पर्धेतून बाहेर केले. तत्पुर्वी सलामीवीर स्मृती मानधनाने 71, कर्णधार मिताली राजने 68, शेफालीने 53 धावा केल्या. त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना भारताने 274 धावा केल्या होत्या. त्यानंतर लॉरा वोल्वार्डने 80 आणि मायग्नॉन डु प्रीझच्या 52 धावांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने हे लक्ष्य सहजतेने पार केले.
दक्षिण आफ्रिकेने शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात लक्ष्य गाठले. मॅचची शेवटची ओव्हर हाय व्होल्टेज होती. या षटकाने सर्वांच्या हृदयाचे ठोके वाढले होते. कधी या एका षटकात दक्षिण आफ्रिकेचा तर कधी भारताचा विजय पाहायला मिळत होता, मात्र शेवटच्या षटकातील 5व्या चेंडूवर दीप्ती शर्माने नो बॉल टाकला, ज्यामुळे भारताच्या हातून सामनाही हिरावला गेला.
दक्षिण आफ्रिकेने सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर एक धाव घेत 3 गडी राखून सामना जिंकला. या पराभवामुळे टीम इंडिया वर्ल्ड कपमधून बाहेर पडली. याचा फायदा वेस्ट इंडिजला मिळाला आणि त्यांनी उपांत्य फेरी गाठली. आफ्रिकेचा संघ आधीच उपांत्य फेरीत पोहोचला आहे, तर वेस्ट इंडिजने टीम इंडियाच्या पराभवामुळे उपांत्य फेरी गाठली आहे.
-
West Indies have qualified for the #CWC22 semi-finals 👏 pic.twitter.com/GmR5KdcbQg
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) March 27, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">West Indies have qualified for the #CWC22 semi-finals 👏 pic.twitter.com/GmR5KdcbQg
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) March 27, 2022West Indies have qualified for the #CWC22 semi-finals 👏 pic.twitter.com/GmR5KdcbQg
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) March 27, 2022