ETV Bharat / sports

WI vs IND 3rd ODI : नाणेफेक जिंकून भारताचा फलंदाजीचा निर्णय; टीम इंडियात एक, तर वेस्ट इंडिज संघात तीन बदल

भारत आणि वेस्ट इंडिज संघातील तिसऱ्या आणि अंतिम वनडे सामन्याला संध्याकाळी सातला सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक आणि वेस्ट इंडिज संघात तीन बदल करण्यात आले आहेत.

WI vs IND
WI vs IND
author img

By

Published : Jul 27, 2022, 6:49 PM IST

पोर्ट ऑफ स्पेन : भारत आणि वेस्ट इंडिज संघात आज वनडे मालिकेतील तिसरा ( WI vs IND 3rd ODI ) आणि अंतिम सामना खेळला जाणार आहे. या सामन्याला पोर्ट ऑफ स्पेन येथे संध्याकाळी सातला सुरुवात होणार आहे. या अगोदर भारतीय संघाचा कर्णधार शिखर धवन ( Captain Shikhar Dhawan ) आणि वेस्ट इंडिज कर्णधार निकोलस पूरन यांच्यात नाणेफेक पार पडली आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या मालिकेत भारतीय संघाने अगोदरच 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे त्यामुळे हा सामना जिंकून भारत धवनच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप देण्याच्या निर्धाराने मैदानात ( India determination for a clean sweep ) उतरेल. त्याचबरोबर वेस्ट इंडिज संघाचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न राहिल. आजच्या सामन्यासाठी भारतीय संघात फक्त एक बदल करण्यात आला आहे. आवेश खानच्या जागी प्रसिद्ध कृष्णा संघात स्थान देण्यात आले आहे. वेस्ट इंडिज संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल करण्यात आले आहेत. ज्यामध्ये जेसन होल्डर, किमो पॉल आणि कीसी कार्टी संधी देण्यात आली आहे.

वेस्ट इंडिजचा विचार करता, त्यांच्याकडे क्षमता आहे, परंतु ते त्यांचे सर्वोत्तम प्रदर्शन करण्यात ते अपयशी ठरले आहेत. ते आतापर्यंत शाई होप, निकोलस पूरन ( Captain Nicholas Pooran ), रोव्हमन पॉवेल किंवा रोमेरिओ शेफर्डवर अवलंबून आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संघाने आतापर्यंत महत्त्वाच्या प्रसंगी चांगली कामगिरी केलेली नाही. याआधी बांगलादेशकडून 0-3 असा पराभव पत्करलेल्या वेस्ट इंडिजचे वनडेतील पराभवाची मालिका खंडित करण्याचे लक्ष्य असेल.

भारत (प्लेइंग इलेव्हन): शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), दीपक हुडा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल आणि प्रसिद्ध कृष्णा.

  • A look at our Playing XI for the final ODI.

    One change for #TeamIndia. Prasidh Krishna comes in for Avesh Khan.

    Ravindra Jadeja was not available for selection for the 3rd ODI since he is still not 100 percent fit.The medical team will continue to monitor his progress.#WIvIND pic.twitter.com/4bkh524SBu

    — BCCI (@BCCI) July 27, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

वेस्ट इंडीज (प्लेइंग इलेव्हन): शाई होप (यष्टीरक्षक), ब्रँडन किंग, कीसी कार्टी, शामर ब्रूक्स, निकोलस पूरन (कर्णधार), काइल मेयर्स, जेसन होल्डर, कीमो पॉल, अकील होसेन, हेडन वॉल्श आणि जेडेन सील्स.

हेही वाचा - IND vs WI T-20 Series : केएल राहुल टी-20 मालिकेतूनही पडणार बाहेर; पुनरागमन केव्हा होणार, घ्या जाणून

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.