ETV Bharat / sports

Yuvraj Singh Statement : भारत 2019 चा क्रिकेट विश्वचषक का हरला?, युवराज सिंगने सांगितले कारण - अनुभवी फलंदाज अंबाती रायडू

2019 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाच्या पराभवाचे कारण माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने सांगितले आहे. तो म्हणतो, टीम इंडियाकडे योग्य रणनीतीचा अभाव आहे. मँचेस्टर येथे खेळल्या गेलेल्या विश्वचषक उपांत्य फेरीत न्यूझीलंडने भारताचा 18 धावांनी पराभव केला होता.

Yuvraj Singh
Yuvraj Singh
author img

By

Published : May 5, 2022, 5:52 PM IST

मुंबई: भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगला ( Former all-rounder Yuvraj Singh ) वाटते की, इंग्लंडमध्ये झालेल्या २०१९ क्रिकेट विश्वचषकासाठी संघ योग्य नियोजन करण्यात अपयशी ठरला होता. चौथ्या क्रमांकासाठी विजय शंकर आणि ऋषभ पंत यांच्यातील अदलाबदलीचा संदर्भ देत युवराज म्हणाला की, फलंदाजी क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर अनुभवी फलंदाज असता, तर भारत या स्पर्धेत चांगली कामगिरी करू शकला असता.

टूर्नामेंटमधील मधल्या फळीत भारताच्या फलंदाजीची कमतरता होती, विशेषत: चौथ्या क्रमांकावर समस्या निर्माण झाल्या होत्या, अनुभवी फलंदाज अंबाती रायडूला ( Veteran Batsman Ambati Rayudu ) 15 जणांच्या संघातून वगळण्यात आले होते. शिखर धवन ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडल्याने केएल राहुलने स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला सुरुवात केली होती.

राहुलला सलामीवीर म्हणून आणल्यानंतर शंकरला प्लेइंग इलेव्हनमध्ये चौथ्या क्रमांकावर संधी देण्यात आली होती, पण दुखापतीमुळे तोही वर्ल्ड कपमधून बाहेर पडला होता. उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभूत होऊन भारत बाहेर होईपर्यंत स्पर्धेच्या अखेरपर्यंत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत धवनच्या जागी पंत स्पर्धेत दाखल झाला होता.

युवराजने संजय मांजरेकरला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, जेव्हा आम्ही विश्वचषक (2011) जिंकलो, तेव्हा आम्हाला सर्वाना फलंदाजीसाठी एक जागा देण्यात आली होती. 2019 च्या विश्वचषकात मला जाणवले की, त्यांनी त्यांचे चांगले नियोजन केले नव्हते. त्यांनी विजय शंकरला फक्त 5-7 एकदिवसीय सामने खेळून चौथ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी दिली, त्यानंतर त्याच्या जागी ऋषभ पंतला खेळवले. आम्ही 2003 चा विश्वचषक खेळलो तेव्हा मोहम्मद कैफ, दिनेश मोंगिया आणि मी आधीच 50 वनडे खेळलो होतो.

2011 च्या विश्वचषकात 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' पुरस्कार जिंकणाऱ्या युवराजने ठळकपणे सांगितले की, भारताच्या मधल्या फळीची समस्या टी-20 फॉरमॅटमध्येही आहे, जी गेल्या वर्षी संयुक्त अरब अमिरातीमध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकात दिसली होती. त्याच वेळी, आयपीएलमध्ये, तेच मधल्या फळीतील फलंदाजांनी फ्रँचायझीसाठी चांगली फलंदाजी केली, तर टी-20 विश्वचषकात त्यांच्या कामगिरीत कमी दिसून आली होती.

क्रिकेटच्या भवितव्यावर आपले मत व्यक्त करताना युवराज म्हणाला की, सध्याच्या काळात टी-20 क्रिकेटच्या लोकप्रियतेमुळे खेळाडूंना त्यांच्या प्राधान्यक्रमांवर पुनर्विचार करण्यास भाग पाडले आहे. युवराजने असेही सांगितले की 50 षटकांचे क्रिकेट लोकप्रियतेसाठी संघर्ष करेल, कारण टी -20 क्रिकेट हे खेळाचे प्रमुख स्वरूप आहे.

हेही वाचा - Sunil Gavaskar Return Plot : आव्हाडांची नाराजी; सुनिल गावस्करांनी सरकारला भूखंड केला परत, वाचा काय आहे प्रकरण?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.