अहमदाबाद : भारत विरुद्ध वेस्ट इंडीज (India v West Indies) संघात वनडे आणि टी-20 मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी वेस्ट इंडीजचा संघ आज सकाळी भारतात दाखल झाला आहे. या दोन्ही संघात 6 फेब्रुवारीपासून अहमदाबाद येथे तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. तसेच या मालिकेतील सर्व सामने नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium Ahmedabad) खेळले जाणार आहेत.
-
WI arrive safely in Ahmadabad! ✈️ 🇮🇳
— Windies Cricket (@windiescricket) February 2, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
The #MenInMaroon have a quick turnaround, as WI get ready to play @BCCI in 3 ODI’s here, starting on February 6 #INDvsWI 🏏🌴 pic.twitter.com/WSHvHKoqVA
">WI arrive safely in Ahmadabad! ✈️ 🇮🇳
— Windies Cricket (@windiescricket) February 2, 2022
The #MenInMaroon have a quick turnaround, as WI get ready to play @BCCI in 3 ODI’s here, starting on February 6 #INDvsWI 🏏🌴 pic.twitter.com/WSHvHKoqVAWI arrive safely in Ahmadabad! ✈️ 🇮🇳
— Windies Cricket (@windiescricket) February 2, 2022
The #MenInMaroon have a quick turnaround, as WI get ready to play @BCCI in 3 ODI’s here, starting on February 6 #INDvsWI 🏏🌴 pic.twitter.com/WSHvHKoqVA
क्रिकेट वेस्ट इंडिजने आपल्या (Cricket West Indies information) अधिकृत ट्विटर अकाउंटवर बुधवारी सकाळी पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. क्रिकेट वेस्ट इंडिजने आपल्या ट्विटमध्ये लिहले की, "बार्बडोसहून दोन दिवसांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर, मेन इन मॅरून भारतात आले आहेत!"
तत्पुर्वी गुजरात क्रिकेट असोसिएशन (Gujarat Cricket Association), जे तीन एकदिवसीय सामन्यांचे आयोजन करणार आहे, त्यांनी आधीच सांगितले आहे की सध्याच्या कोविड-19 परिस्थितीमुळे सामने बंद दाराआड खेळवले जातील. परंतु कोलकाता येथे खेळल्या जाणाऱ्या टी-20 मालिकेसाठी पश्चिम बंगाल सरकारने 75 टक्के प्रेक्षकांना मैदानावर उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे.
-
After a long couple days of travel from Barbados, the #MenInMaroon have arrived in India! ✌🏿 #INDvWI 🏏🌴 pic.twitter.com/ogvbrtQqTy
— Windies Cricket (@windiescricket) February 2, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">After a long couple days of travel from Barbados, the #MenInMaroon have arrived in India! ✌🏿 #INDvWI 🏏🌴 pic.twitter.com/ogvbrtQqTy
— Windies Cricket (@windiescricket) February 2, 2022After a long couple days of travel from Barbados, the #MenInMaroon have arrived in India! ✌🏿 #INDvWI 🏏🌴 pic.twitter.com/ogvbrtQqTy
— Windies Cricket (@windiescricket) February 2, 2022
कोलकाता येथे टी-20 मालिकेला 16 फेब्रुवारी पासून सुरुवात होणार आहे. टी-20 मालिकेतील दुसरा आणि तिसरा टी-20 सामना 18 आणि 20 फेब्रुवारीला होणार आहे. हे सर्व सामने कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडिअमवर (Eden Gardens Stadium in Kolkata) खेळले जाणार आहेत.
वेस्ट इंडिजचा वनडे संघ-
कायरन पोलार्ड (कर्णधार), फॅबियन ऍलेन, एनक्रुमाह बोनर, डॅरेन ब्रावो, शमारह ब्रूक्स, जेसन होल्डर, शाय होप, अकील हुसैन, अल्जारी जोसेफ, ब्रेंडन किंग, निकोलस पूरन, केमार रोच, रोमारियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, हेडन वाल्श जूनियर.
वेस्ट इंडिजचा टी२० संघ-
कायरन पोलार्ड (कर्णधार), निकोलस पूरन (उपकर्णधार), फॅबियन ऍलेन, डॅरेन ब्रावो, रोस्टेन चेज, शेल्डन कॉटरेल, डोमिनिक ड्रेक, जेसन होल्डर, शाय होप, अकील हुसैन, ब्रेंडन किंग, रोवमन पॉवेल, रोमॅरियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, कायल मेयर्स आणि हेडन वाल्श जूनियर.
हेही वाचा : Fih Pro League: भारताने चीनवर सलग दुसरा विजय मिळवत गुणतालिकेत पटकावले अव्वल स्थान