बंगळुरू : भारत विरुद्ध श्रीलंका संघातील दोन सामन्यांची कसोटी मालिका सोमवारी पार पडली. या मालिकेत भारताने श्रीलंका संघाला 2-0 ने क्लीन स्वीप दिला. ज्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने आभासी पत्रकार परिषदेत ( Virtual Press Conference of Rohit Sharma ) आपल्या संघातील खेळाडूंबाबत प्रतिक्रिया दिल्या. ज्यामध्ये यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतबद्दल महत्वाचे वक्तव्य केले.
-
🗣️ 🗣️ #TeamIndia captain @ImRo45 speaks about the experience and learnings on leading the side for the first time in a Test series. 👍 👍#INDvSL | @Paytm pic.twitter.com/41EuDxyDrG
— BCCI (@BCCI) March 14, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">🗣️ 🗣️ #TeamIndia captain @ImRo45 speaks about the experience and learnings on leading the side for the first time in a Test series. 👍 👍#INDvSL | @Paytm pic.twitter.com/41EuDxyDrG
— BCCI (@BCCI) March 14, 2022🗣️ 🗣️ #TeamIndia captain @ImRo45 speaks about the experience and learnings on leading the side for the first time in a Test series. 👍 👍#INDvSL | @Paytm pic.twitter.com/41EuDxyDrG
— BCCI (@BCCI) March 14, 2022
रिषभ पंत हा आपल्या आक्रमक शैलीमुळे ( Rishabh Pant aggressive style ) बऱ्याचवेळा आपली विकेट्स गमावून बसतो. परंतु सोमवारी रोहित शर्मा म्हणाला की, रिषभ मध्ये काही मिनिटात सामना बदलण्याची क्षमता आहे. त्याच्या या क्षमतेमुळे त्याच्या स्वाभाविक खेळाला स्वीकारायला तयार आहे. त्याचबरोबर रोहित म्हणाला, पंतला खेळपट्टीनुसार फलंदाजी करण्यास सांगितले आहे.
आभासी पत्रकार परिषदेत ( Virtual Press Conference ) बोलताना रोहित शर्मा म्हणाला, "तो कसा फलंदाजी करतो हे आम्हाला माहीत आहे आणि एक संघ म्हणून आम्ही त्याला त्याचा नैसर्गिक खेळ खेळण्याचे स्वातंत्र्य देऊ इच्छितो. पण त्याला सामन्यातील परिस्थिती आणि खेळपट्टीचाही विचार करण्यास सांगण्यात आले आहे. तो चांगल्या पद्धतीने खेळी करत पुढे जात आहे. तसेच तो परिपक्व देखील होत आहे. कधी-कधी तो असे काही शॉट का खेळतो. ज्यामुळे तुम्हाला डोक्याला हात लावावा लागते. पण तो खेळला म्हणून आपण त्याला स्वीकारावं. जसा तो खेळतो."
-
Words of praise from #TeamIndia Captain @ImRo45 for the champion bowler @ashwinravi99 👏 👏#INDvSL | @Paytm pic.twitter.com/SKySkSMj13
— BCCI (@BCCI) March 14, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Words of praise from #TeamIndia Captain @ImRo45 for the champion bowler @ashwinravi99 👏 👏#INDvSL | @Paytm pic.twitter.com/SKySkSMj13
— BCCI (@BCCI) March 14, 2022Words of praise from #TeamIndia Captain @ImRo45 for the champion bowler @ashwinravi99 👏 👏#INDvSL | @Paytm pic.twitter.com/SKySkSMj13
— BCCI (@BCCI) March 14, 2022
तो पुढे म्हणाला, ''तो असा खेळाडू आहे, जो अर्धा तास ते 40 मिनिटात सामन्याचा नकाशा बदलू शकतो. त्याचे यष्टीरक्षण देखील सुंदर आहे. त्याचबरोबर प्रत्येक सामन्यात त्यामध्ये तो सुधारणा करतोय. डीआरएसबाबत त्याचे निर्णय अचूक ( Rishabh decision regarding DRS correct ) ठरत आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये नेतृत्व करण्याबद्दल विचारले असता रोहित शर्मा म्हणाला, "संघात काही वरिष्ठ खेळाडू आहेत, जे खेळाला चांगल्या पद्धतीने समजतात आणि आपला सल्ला देतात. माझी स्वतःची समज आहे. त्यावेळी योग्य निर्णय घेणे हेच कर्णधारपदाच्या बाबतीत माझे तत्वज्ञान आहे. मी मैदानावरील परिस्थितीचे आकलन करतो.”
-
FIFTY!@RishabhPant17 surpasses Kapil Dev to score the fastest 50 by an Indian in Test cricket. It has come off 28 deliveries.
— BCCI (@BCCI) March 13, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Take a bow, Rishabh 👏💪💥
Live - https://t.co/t74OLq7xoO #INDvSL @Paytm pic.twitter.com/YcpJf2sp2H
">FIFTY!@RishabhPant17 surpasses Kapil Dev to score the fastest 50 by an Indian in Test cricket. It has come off 28 deliveries.
— BCCI (@BCCI) March 13, 2022
Take a bow, Rishabh 👏💪💥
Live - https://t.co/t74OLq7xoO #INDvSL @Paytm pic.twitter.com/YcpJf2sp2HFIFTY!@RishabhPant17 surpasses Kapil Dev to score the fastest 50 by an Indian in Test cricket. It has come off 28 deliveries.
— BCCI (@BCCI) March 13, 2022
Take a bow, Rishabh 👏💪💥
Live - https://t.co/t74OLq7xoO #INDvSL @Paytm pic.twitter.com/YcpJf2sp2H
तो जसप्रीत बुमराहचे कौतुक करताना म्हणाला, त्याच्या कामगीरीने जास्त प्रभावित केले आहे. तसेच संघाचे लक्ष्य जागतिक कसोटी चॅम्पियनशीपमध्ये पोहचण्याचे आहे. तसेच आम्ही जास्त पुढचा विचार करत नाही. कारण त्याचा आता विचार करुन जास्त उपयोग होणार नाही. त्यामुळे सध्याच्या स्थितीवर नजर ठेवावी लागेल. तसेच लहान-लहान लक्ष्य बनवणे गरजेचे आहे.