मुंबई - इंग्लंडच्या संघाने पाकिस्तान दौरा करणार नसल्याचे जाहीर केले. तेव्हा पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानने नेहमी खेळात सर्वांचा समावेश करण्याचे प्रयत्न केले आहे. पण इतराने असे केले नाही, असे त्याने सांगितलं आहे.
इंग्लंडचा पुरूष आणि महिला संघ ऑक्टोबर महिन्यात पाकिस्तानचा दौरा करणार होता. पण त्यांनी हा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या आधी न्यूझीलंड संघाने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला आहे.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम या विषयावरून दु:खी आहे. त्याने ट्विट करत म्हटलं आहे की, पुन्हा एकदा आम्ही निराश झालो. आम्ही नेहमी खेळात सर्वांचा समावेश करण्याचे प्रयत्न केले. पण इतरांनी असं केलं नाही. आम्ही क्रिकेटमध्ये खूप लांबचा प्रवास पूर्ण केला आहे आणि हे केवळ वेळेनुसार चांगले होईल. आमचे क्रिकेट नक्कीच समृद्ध होईल.
बाबर याने न्यूझीलंड संघाने दौऱ्यातून माघार घेतल्यानंतर सांगितलं की, पाकिस्तानच्या सुरक्षा संघटनेच्या क्षमतेवर आपला पूर्ण विश्वास आहे.
दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीज राजा यांनी देखील इंग्लंड संघाने दौऱ्यास येण्यास नकार दिल्याने नाराजी व्यक्त केली. त्यांनी आम्ही याचा वचपा टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत खेळताना मैदानावर काढू, अशी चेतावणी इंग्लंड आणि न्यूझीलंड संघाला दिली आहे.
हेही वाचा - न्यूझीलंड नंतर इंग्लंडचा पाकमध्ये खेळण्यास नकार; रमीज राजा म्हणाले, आम्ही मैदानात बदला घेऊ
हेही वाचा - Ind W Vs Aus W : ऑस्ट्रेलियाकडून भारतीय महिला संघाचा दारूण पराभव