ETV Bharat / sports

Shane Warne Death : शेन वॉर्नबाबात थायलंड पोलिसांचा महत्वाचा खुलासा; म्हणाले, "...अन् टॉवेलवर रक्ताचे" - शेन वॉर्नबाबात थायलंड पोलिसांचा खुलासा

महान लेग स्पिनर शेन वॉर्नचे शुक्रवारी निधन झाले ( Shane Warne Death ) त्यानंतर थायलंड पोलिसांनी एक महत्वाची माहिती दिली आहे. त्याच्या खोलीत तसेच टाॅवेलवर रक्ताचे डाग आढळून आल्याचे ( Warnes Room Had Blood Stains ) म्हणले आहे.

Shane Warne
Shane Warne
author img

By

Published : Mar 6, 2022, 5:35 PM IST

हैदराबाद - ऑस्ट्रेलियाचा महान लेग स्पिनर शेन वॉर्न याचे शुक्रवारी निधन झाले ( Shane Warne Death ). थायलंडमध्ये एका व्हिलात मित्रांना तो बेशुद्ध अवस्थेत सापडला. हृदयविकाराच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता वॉर्नच्या मॅनेजमेंटने व्यक्त केली होती. नंतर आता वॉर्नच्या मृत्यूबाबात एक मोठी बातमी समोर आली आहे.

थायलंडचे पोलिस अधिकारी सतीत पोलपिनट यांनी सांगितल्यानुसार, शेन वॉर्नच्या खोलीत, फरशीवर आणि अंघोळीच्या टॉवेलवर रक्ताचे डाग दिसून आले ( Warnes Room Had Blood Stains ) आहेत. जेव्हा वॉर्नला हृदयविकाराच्या धक्का आला, तेव्हा त्याच्या मित्राने त्याला सीपीआर दिला. सीपीआर सुरु झाल्यानंतर वॉर्नच्या खोकल्यातून रक्तस्त्राव होत होता.

दरम्यान, वॉर्नने अलिकडेच त्याच्या हृदयाविषयी डॉक्टरांना दाखवले होते. त्याबाबत त्याने डॉक्टरांशी सुद्धा चर्चा केली होती, अशी माहिती थायलंडचे पोलीस अधिकारी युत्ताना सिरीसोम्बात यांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून शेन वॉर्न थायलंडमध्ये त्याच्या मित्रांसोबत राहत होता. शुक्रवारी संध्याकाळी शेन वॉर्न जेवणासाठी उठलाच नाही. त्याचीच चौकशी करण्यासाठी एक मित्र शेन वॉर्नकडे गेलेला. पण, शेन वॉर्न शुद्धीवर नसल्याचे त्याला समजले. त्यानंतर त्याने तो शुद्धीवर येण्यासाठी सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या मित्रांना यश आले नाही. आणि अखेर शेनचे निधन झाले, अशी माहिती थायलंडमधील पोलीस अधिकारी चॅटचाविन नाकमुसिक यांनी रॉयटर्सला दिली आहे.

हेही वाचा - Women World Cup : मिताली राज सहा वेळा क्रिकेट विश्वचषकात सहभागी होणारी पहिली महिला क्रिकेटपटू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.