ETV Bharat / sports

Shane Warne Passes Away : पहिल्या आयपीएलमध्ये वॉर्नने मला मोठा मंच दिला - रविंद्र जडेजा - रविंद्र जडेजा न्यूज

राजस्थान रॉयल्सने आयपीएलचा पहिला हंगाम ( First season of IPL ) जिंकला होता आणि जडेजाने 'फिनिशर'ची भूमिका बजावली होती. त्यामुळे तो वॉर्नचा आवडता बनला, ज्याने त्याला 'द रॉकस्टार' असे टोपणनाव दिले.

Ravindra Jadeja
Ravindra Jadeja
author img

By

Published : Mar 6, 2022, 12:14 PM IST

मोहाली : फिरकीचा जादूगार शेन वार्नचे दोन दिवसापूर्वी 52 वर्षी निधन झाले. त्यानंतर आता भारतीय संघाचा अष्टपैलू रविंद्र जडेजाने ( All-rounder Ravindra Jadeja ) शेन वार्न सोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 2008 साली आयपीएल स्पर्धेत रविंद्र जडेजा जेव्हा राजस्थान रॉयल्स संघाचा भाग होता, तेव्हा शेन वार्न त्या संघाचा कर्णधार होता. त्याचा युवा खेळाडूवर विश्वास होता. त्यामुळे तो क्रीडा चाहत्यांमध्ये झटपट 'हिट' झाला.

राजस्थान रॉयल्सने आयपीएलचा पहिला हंगाम जिंकला ( Rajasthan Royals IPL winners ) होता आणि जडेजाने 'फिनिशर'ची भूमिका बजावली होती. त्यामुळे तो वॉर्नचा आवडता बनला, ज्याने त्याला 'द रॉकस्टार' असे टोपणनाव दिले. लेग-स्पिनच्या कलेला जीवदान देणाऱ्या वॉर्नचे शुक्रवारी वयाच्या 52व्या वर्षी थायलंडमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने क्रिकेट जगताला मोठा धक्का ( A big blow to world of cricket ) बसला.

जडेजाला वॉर्नसोबत घालवलेल्या वेळेबद्दल विचारले असता तो म्हणाला, "ही धक्कादायक बातमी होती. हे ऐकून मला खूप वाईट वाटले. मला ही बातमी खरी वाटत नव्हती."

तो म्हणाला, "2008 मध्ये जेव्हा मी त्यांना भेटलो तेव्हा तो एक महान क्रिकेटर बनला होता. शेन वॉर्नसारख्या दिग्गज व्यक्तीसोबत आपण खेळू यावर माझा विश्वासच बसत नव्हता. वॉर्नसोबत ड्रेसिंग रूम शेअर करणे ( Sharing a dressing room with Warne ) ही आमच्यासारख्या तरुणांसाठी मोठी गोष्ट होती त्यांनी मला एक मोठा मंच दिला आणि मी U-19 नंतर थेट आयपीएलमध्ये प्रवेश केला."

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.