मुंबई - तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा वानखेडे स्टेडियमला देखील बसला आहे. या वादळात स्टेडियमधील एक स्टँड कोसळलं तर एका साईट स्क्रीनचेही नुकसान झाले आहे. सद्या याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
तौक्ते चक्रीवादळामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यासह मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोमवारी दिवसभर मुंबईत वादळी वारा सुरू होता. वाऱ्याचा आणि पावसाचा वेग असल्याने समुद्र किनाऱ्याजवळ असलेल्या वानखेडे स्टेडियमचे देखील नुकसान झाले. स्टेडियमधील एका स्टँड थेट जमिनीवर कोसळला. तर बॅट्समनच्या एकाग्रतेसाठी महत्त्वाची असणारी साईट स्क्रिनही जमीनदोस्त झाली.
-
The sight screen below the press box (North Stand) at the Wankhede Stadium is completely damanged by the strong winds. #CycloneTauktae pic.twitter.com/GBMtdnSHzP
— Harit Joshi (@Haritjoshi) May 17, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">The sight screen below the press box (North Stand) at the Wankhede Stadium is completely damanged by the strong winds. #CycloneTauktae pic.twitter.com/GBMtdnSHzP
— Harit Joshi (@Haritjoshi) May 17, 2021The sight screen below the press box (North Stand) at the Wankhede Stadium is completely damanged by the strong winds. #CycloneTauktae pic.twitter.com/GBMtdnSHzP
— Harit Joshi (@Haritjoshi) May 17, 2021
तौक्ते चक्रीवादळामुळे वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या नुकसानीचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. असाच एक फोटो ट्विटरवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या फोटोतील वानखेडे स्टेडियमची अवस्था पाहून क्रिकेट फॅन्सना दु:ख झालं आहे. दरम्यान, तौक्ते चक्रीवादळ निघून गेल्यानंतरही मुंबईत मंगळवारी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे धोका अद्याप टळलेला नाही.
हेही वाचा - भारताची स्टार खेळाडू प्रिया पूनियाच्या आईचे कोरोनामुळे निधन
हेही वाचा - कुस्तीपटू सागर राणा हत्या प्रकरण: सुशील कुमारची माहिती देणाऱ्याला पोलिसांकडून १ लाखांचे बक्षिस जाहीर