हैदराबाद: आयसीसीने बुधवारी ताजी एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली ( ICC ODI Rankings Announce ) आहे. ज्यामध्ये काही खेळाडूंना फायदा झाला आहे, तर काही खेळाडूंना तोटा झाला आहे. भारतीय फलंदाज विराट कोहलीचे नाव एकेकाळी आयसीसी वनडे क्रमवारीत अव्वल स्थानावर असायचे. परंतु आता जाहीर झालेल्या ताज्या क्रमवारीत बदल झाला आहे.
विराट कोहली म्हणजे पहिल्या क्रमांकाचा एकदिवसीय फलंदाज असे समीकरण होते, पण आता त्याची व्याख्या थोडी बदलली आहे. कारण विराट कोहलीने खराब कामगिरी आणि कमी सामन्यांमुळे नंबर वनची खुर्ची तर गमावलीच होती. परंतु आता तो नंबर दोनवरुन देखील खाली घसरला आहे. पाकिस्तानच्या आणखी एका फलंदाजाने दुसरे स्थान पटकावले आहे.
-
🔸Imam-ul-Haq leapfrogs Virat Kohli into top two 🔼
— ICC (@ICC) June 15, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
🔸Shaheen Afridi, Josh Hazlewood surge 📈
🔸Zeeshan Maqsood makes all-round gains 💪
Lots of movement in the latest @MRFWorldwide ICC Men’s ODI Player Rankings 👉 https://t.co/NICjDWq6YL pic.twitter.com/zQfn9iFitD
">🔸Imam-ul-Haq leapfrogs Virat Kohli into top two 🔼
— ICC (@ICC) June 15, 2022
🔸Shaheen Afridi, Josh Hazlewood surge 📈
🔸Zeeshan Maqsood makes all-round gains 💪
Lots of movement in the latest @MRFWorldwide ICC Men’s ODI Player Rankings 👉 https://t.co/NICjDWq6YL pic.twitter.com/zQfn9iFitD🔸Imam-ul-Haq leapfrogs Virat Kohli into top two 🔼
— ICC (@ICC) June 15, 2022
🔸Shaheen Afridi, Josh Hazlewood surge 📈
🔸Zeeshan Maqsood makes all-round gains 💪
Lots of movement in the latest @MRFWorldwide ICC Men’s ODI Player Rankings 👉 https://t.co/NICjDWq6YL pic.twitter.com/zQfn9iFitD
एकदिवसीय क्रमवारीत विराट कोहलीला आणखी एक धक्का बसला आहे. तो आता तिसऱ्या क्रमांकावर ( Virat Kohli ODI rankings Third Number ) आला आहे. पाकिस्तान संघाचा सलामीवीर इमाम-उल-हक ( Opener Imam-ul-Haq ) आता आयसीसी वनडे क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने एक उंच झेप घेतली आहे. त्याचबरोबर विराट कोहलीला दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या क्रमांकावर घसरावे लागले आहे. पहिल्या क्रमांकावरही पाकिस्तानच्या फलंदाजांनी कब्जा केला आहे. बाबर आझम सध्या नंबर वन वनडे फलंदाज आहे.
आयसीसी वनडे क्रमवारीत रोहित शर्मा ( Captain Rohit Sharma ) चौथ्या, तर क्विंटन डी कॉक पाचव्या स्थानावर आहे. गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर जसप्रीत बुमराह चौथ्या क्रमांकावरून पाचव्या स्थानावर घसरला आहे. त्याच वेळी, जोश हेझलवूडने दुस-या स्थानावर जाण्यासाठी एक स्थानाचा फायदा झाला आहे, तर मॅच हेन्रीने देखील एक स्थानांनी वर आला आहे. तो आता तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. शाहीन आफ्रिदी चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
तसेच अष्टपैलूच्या क्रमवारीत पहिले चार खेळाडू आपापल्या स्थानावर कायम आहेत. ज्यामध्ये शाकीब अल हसन (419), मोहम्मद नबी (323), राशिद खान (290) आणि क्रिस वोक्स (268) हे खेळाडू अनुक्रमे क्रमवारीत पहिल्या चार क्रमांकावर आहेत.
हेही वाचा - Kapil Dev Statement : '१-२ मॅचमध्ये धावा करतो परत अपयशी होतो...', 'या' खेळाडूवर संतापले कपिल देव