अहमदाबाद : आयपीएल 2022 या स्पर्धेला 26 मार्च पासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व दहा संघ सज्ज झाले आहेत. या स्पर्धेत हार्दिक पांड्या ( All-rounder Hardik Pandya ) गुजरात टायटन्स संघाच्या कर्णधाराची भूमिका पार पाडणार आहे. त्याचबरोबर हार्दिक पांड्याच्या फिटनेसबाबत गुजरात टायटन्सचे डायरेक्टर ऑफ क्रिकेट विक्रम सोलंकी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कोच विक्रम सोलंकी ( Coach Vikram Solanki ) यांनी हार्दिक पांड्याच्या फिटनेसवर समाधान व्यक्त केले आहे. सोलंकी यांच्या मते, आपण हार्दिक पांड्याकडून कमी मागणी केली पाहिजे. हार्दिक पांड्याच्या फिटनेसचा काही महिन्यांपासून चिंतेचा विषय ठरला आहे. त्याचबरोबर त्याच्यावर गुजरात टायटन्स संघाच्या नेतृत्वासाठी धुरा देखील त्याच्या खांद्यावर आहे. त्यामुळे त्याने लवकर तंदुरुस्त होणे संघासाठी आणि त्याच्यासाठी महत्वाचे आहे.
हार्दिक पांड्याच्या फिटनेसबाबत विक्रम सोलंकी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विक्रम सोलंकी यांनी द टेलिग्राफला मुलाखत ( Interview with The Telegraph ) दिली आहे. या द टेलिग्राफच्या मुलाखतीत बोलताना म्हणाले, ''हार्दिक पांड्या त्याच्या खेळाच्या प्रत्येक पैलूवर मेहनत घेत आहे. रिहॅबिलिटेशन आणि रिकवरीला घेऊन तो सात्तत्याने काम करत आहे. त्याला गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात वेग आणायचा आहे. या गोष्टीबद्दल तो खुपच दक्ष आहे.
विक्रम सोलंकी पुढे म्हणाले, तो रिकवरीच्या वाटेवर आहे आणि पूर्णपणे खेळत आहे. परंतु आपण त्याच्याकडून थोडी कमी अपेक्षा ठेवली पाहिजे. कारण लक्षात असूद्या तो दुखापतीतून पुनरागमन करत आहे. एक फलंदाज म्हणून तो कोणत्याही संघासाठी जबरदस्त खेळाडू आहे. तथापि, जर आपण फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण एकत्र केले तर ते एक संपूर्ण पॅकेज आहे. आपण त्याच्या दीर्घकालीन योजना लक्षात ठेवल्या पाहिजेत. पांड्या ज्या प्रकारे प्रगती करत आहे त्यामुळे आम्ही खूप खूश आहोत.
गुजरात टायटन्स (Gujarat Titans) :
-
How excited are you to witness @gujarat_titans in action❓🤔
— IndianPremierLeague (@IPL) February 14, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
A look at their squad as they gear up for their maiden IPL appearance 🔽 #TATAIPL pic.twitter.com/yQ38D01aG6
">How excited are you to witness @gujarat_titans in action❓🤔
— IndianPremierLeague (@IPL) February 14, 2022
A look at their squad as they gear up for their maiden IPL appearance 🔽 #TATAIPL pic.twitter.com/yQ38D01aG6How excited are you to witness @gujarat_titans in action❓🤔
— IndianPremierLeague (@IPL) February 14, 2022
A look at their squad as they gear up for their maiden IPL appearance 🔽 #TATAIPL pic.twitter.com/yQ38D01aG6
शुभमन गिल, जेसन रॉय, ऋद्धिमान साहा, अभिनव मनोहर, विजय शंकर, हार्दिक पंड्या, राहुल तेवतिया, डॉमिनिक ड्रेक, रशीद खान, मोहम्मद शमी, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल, जयंत यादव, आर साई किशोर, नूर अहमद, अल्झारी जोसे, प्रदीप जोसे सांगवान, डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड, गुरकीरत सिंग आणि बिसाई सुदर्शन.