बारामुल्ला (जम्मू आणि काश्मीर) : केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी जम्मू-काश्मीरमधील गुलमर्गमध्ये बर्फवृष्टीदरम्यान क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला. 10 फेब्रुवारीपासून गुलमर्गमध्ये खेलो इंडिया हिवाळी खेळ सुरू होत आहेत. यामध्ये देशभरातील हजारो खेळाडू सहभागी होणार आहेत. खेलो इंडिया हिवाळी खेळांबाबत खेळाडूंमध्ये उत्साह पाहायला मिळतो आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी गुलमर्गला पोहोचलेले क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर अतिशय उत्साही दिसत होते. बर्फवृष्टीचा आनंद लुटताना ते तिथे उपस्थित काही तरुणांसोबत क्रिकेट खेळले. या दरम्यान त्यांनी चौकार आणि षटकारही मारले. त्यांच्यासोबत बारामुल्ला जिल्हा प्रशासनाचे अधिकारीही होते. अनुराग ठाकूरने यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर क्रिकेट खेळतानाचा एक व्हिडिओही शेअर केला आहे.
-
Nothing beats the thrill of hitting a six in the snow ⛄️ pic.twitter.com/p9qkCpGjon
— Anurag Thakur (@ianuragthakur) February 9, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Nothing beats the thrill of hitting a six in the snow ⛄️ pic.twitter.com/p9qkCpGjon
— Anurag Thakur (@ianuragthakur) February 9, 2023Nothing beats the thrill of hitting a six in the snow ⛄️ pic.twitter.com/p9qkCpGjon
— Anurag Thakur (@ianuragthakur) February 9, 2023
खेलो इंडिया हिवाळी खेळांचे उद्घाटन : शुक्रवारपासून गुलमर्गमध्ये खेलो इंडिया हिवाळी खेळ होणार आहेत. यासाठी क्रीडामंत्री अनुराग ठाकूर गुलमर्गमध्ये उपस्थित असून शुक्रवारी ते खेळाचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, संपूर्ण भारत खेलो इंडियाची वाट पाहत आहे. यामध्ये युवा, विद्यापीठ आणि हिवाळी खेळ आयोजित केले जातात. सध्या मध्य प्रदेशातील 9 शहरांमध्ये युवा खेळ सुरू आहेत. तर काश्मीरमध्ये हिवाळी खेळांचे आयोजन केले जात आहे. हिवाळी खेळांमध्ये देशभरातील 1500 हून अधिक खेळाडू 11 खेळांमध्ये सहभागी होणार आहेत.
खोऱ्यात बर्फवृष्टीला सुरुवात : 9 फेब्रुवारीला उत्तर काश्मीरमधील बहुतांश भागात हिमवर्षाव झाला. खोऱ्यातील इतर अनेक भागात तसेच पर्यटन स्थळ पहलगाममध्ये मध्यम हिमवृष्टी सुरू आहे. उर्वरित खोऱ्यात पाऊस झाला. हवामानातील या बदलामुळे तापमानात घट नोंदवण्यात आली आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील गुलमर्ग स्की रिसॉर्टमध्ये बुधवारी रात्रीपासून बर्फवृष्टी सुरू झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. खेलो इंडिया हिवाळी खेळ शुक्रवारपासून येथे सुरू होणार आहेत. बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेझ सेक्टर आणि बारामुल्ला, कुपवाडा या भागात गुरुवारी सकाळी हिमवर्षाव सुरू झाला.
खेलो इंडियात महाराष्ट्राचे वर्चस्व : मध्य प्रदेशात सुरू असलेल्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपले वर्चस्व कायम राखले आहे. पदकतालिकेत महाराष्ट्राचे खेळाडू सर्वाधिक 37 सुवर्ण पदकांसह पहिल्या स्थानावर आहेत. यासह त्यांच्या खात्यात 35 रौप्य आणि 31 कांस्य अशी एकूण 101 पदके जमा झाली आहेत. दुसऱ्या क्रमांकावर हरियाणा आहे. हरियाणाने आत्तापर्यंत 25 सुवर्ण, 20 रौप्य, 18 कांस्य पदकांसह 63 पदके जिंकली आहेत.