मुंबई - आगामी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने आज आपल्या 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. यात सूर्यकुमार यादव, राहुल चहर, इशान किशन, वरुण चक्रवर्ती यांना विश्वकरंडक स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच संधी मिळाली आहे. श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर आणि दीपक चहर हे राखीव खेळाडू आहेत. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा टी २० विश्वकरंडक संघाचा मार्गदर्शक असणार आहे, असे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितलं. दरम्यान, यंदा टी-20 विश्वकरंडकाचे आयोजन 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या काळात ओमान आणि यूएईमध्ये करण्यात आले आहे. भारत या स्पर्धेचे यजमानपद भूषवीत आहे.
-
TEAM - Virat Kohli (Capt), Rohit Sharma (vc), KL Rahul, Suryakumar Yadav, Rishabh Pant (wk), Ishan Kishan (wk), Hardik Pandya, Ravindra Jadeja, Rahul Chahar, Ravichandran Ashwin, Axar Patel, Varun Chakravarthy, Jasprit Bumrah, Bhuvneshwar Kumar, Mohd Shami.#TeamIndia
— BCCI (@BCCI) September 8, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">TEAM - Virat Kohli (Capt), Rohit Sharma (vc), KL Rahul, Suryakumar Yadav, Rishabh Pant (wk), Ishan Kishan (wk), Hardik Pandya, Ravindra Jadeja, Rahul Chahar, Ravichandran Ashwin, Axar Patel, Varun Chakravarthy, Jasprit Bumrah, Bhuvneshwar Kumar, Mohd Shami.#TeamIndia
— BCCI (@BCCI) September 8, 2021TEAM - Virat Kohli (Capt), Rohit Sharma (vc), KL Rahul, Suryakumar Yadav, Rishabh Pant (wk), Ishan Kishan (wk), Hardik Pandya, Ravindra Jadeja, Rahul Chahar, Ravichandran Ashwin, Axar Patel, Varun Chakravarthy, Jasprit Bumrah, Bhuvneshwar Kumar, Mohd Shami.#TeamIndia
— BCCI (@BCCI) September 8, 2021
सूर्यकुमार यादव आणि राहुल चहर मिळाली संधी -
आंतरराष्ट्रीय पदार्पणानंतर कामगिरीत सातत्य राखलेल्या सूर्यकुमार यादव आणि लेग स्पिनर राहुल चहर यांना टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळालं आहे. सूर्यकुमार यादवने चार टी-20 सामन्यांत 169.51 च्या स्ट्राइक रेटने 139 धावा केल्या आहेत. यात त्याने दोन अर्धशतके ठोकली आहेत. दुसरीकडे राहुल चहर याने 5 टी-20 सामन्यांत सात विकेट घेतल्या आहेत.
शार्दुल ठाकूरला ओव्हल कसोटीतील चांगल्या कामगिरीचे बक्षीस -
ओव्हल कसोटी सामन्यात शार्दुल ठाकूरने शानदार कामगिरी केली. त्याला टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी स्टँड बाय खेळाडू म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे. त्याने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात गोलंदाजी आणि फलंदाजीत योगदान दिले होते. त्याने पहिल्या डावात 57 तर दुसऱ्या डावात 60 धावांची खेळी केली होती. यासोबत त्याने पहिल्या डावात 1 आणि दुसऱ्या डावात 2 गडी बाद केले होते.
टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ -
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, के एल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, ईशान किशन, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, राहुल चहर, आर अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी.
राखीव खेळाडू - शार्दुल ठाकूर, श्रेयस अय्यर आणि दीपक चहर
असे आहे भारतीय संघाचे वेळापत्रक
- 24 ऑक्टोबर - भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई, वेळ सायंकाळी 7.30 वाजता
- 31 ऑक्टोबर - भारत विरुद्ध न्यूझीलंड, दुबई, वेळ सायंकाळी 7.30 वाजता
- 3 नोव्हेंबर - भारत विरुद्ध अफगाणिस्तान, अबुधाबी, वेळ सायंकाळी 7.30 वाजता
- 5 नोव्हेंबर - भारत विरुद्ध ब गटातील अव्वल, दुबई, वेळ सायंकाळी 7.30 वाजता
- 8 नोव्हेंबर - भारत विरुद्ध अ गटातील उपविजेता, दुबई, सायंकाळी 7.30 वाजता
हेही वाचा - Ind VS Eng : भारतीय संघात एकापेक्षा एक धुरंधर फलंदाज - मार्क वूड
हेही वाचा - मँचेस्टर कसोटीसाठी मोहम्मद शमी फिट; रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा मेडिकल टीमच्या निघराणीत