ETV Bharat / sports

टी नटराजनच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया, पाहा काय म्हणाला टी-२० स्पेशालिस्ट

भारताचा टी-२० स्पेशालिस्ट गोलंदाज टी नटराजनच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

T Natarajan Undergoes Knee Surgery, Says Looking Forward To Come Back Stronger And Fitter
टी नटराजनच्या गुडघ्यावर झाली शस्त्रक्रिया, पाहा काय म्हणाला टी-२० स्पेशालिस्ट
author img

By

Published : Apr 27, 2021, 4:01 PM IST

मुंबई - भारताचा टी-२० स्पेशालिस्ट गोलंदाज टी नटराजनच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. स्वत: नटराजनने सोशल मीडियाद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे.

टी नटराजन आयपीएलमध्ये हैदराबादचे प्रतिनिधित्व करत होता. त्याला स्पर्धेदरम्यान दुखापत झाली. यामुळे तो केवळ २ सामने खेळून उर्वरित आयपीएलच्या चौदाव्या हंगामातून बाहेर झाला. त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

टी नटराजन याने ट्विट करत शस्त्रक्रियेविषयी माहिती दिली आहे. आज माझ्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मेडिकल सर्जन्स, डॉक्टर, नर्स आणि त्यांच्या पूर्ण स्टाफचे आभार. याबरोबरच बीसीसीआय आणि माझ्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार, अशा आशयाचे ट्विट नटराजन याने केले आहे.

  • Today, I underwent knee surgery- and am grateful for the expertise, attention and kindness of the medical team, surgeons, doctors, nurses and staff. I’m grateful to @bcci and to all that have wished well for me. pic.twitter.com/Z6pmqzfaFj

    — Natarajan (@Natarajan_91) April 27, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दरम्यान, नटराजनला गुडघ्याची दुखापत ऑस्ट्रेलिया दौऱ्यात झाली होती. त्यानंतर तो बंगळुरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी येथे उपचारासाठी दाखल झाला होता. उपचारानंतर त्याने आयपीएलमधून पुनरागमन केले. मात्र आयपीएलमध्ये त्याच्या दुखापतीने पुन्हा डोकेवर काढले. यामुळे त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करावी लागली.

हेही वाचा - सलग ४ पराभवानंतर केकेआरला विजय; ५ गडी राखून पंजाबवर मात

हेही वाचा - IPL २०२१ : ‘एकीकडे रुग्णांना बेड मिळत नाही, अन् दुसरीकडे सरकार, संघमालक IPL वर एवढा खर्च करतायेत’

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.