दुबई - टी-20 वर्ल्ड कप 2021चा सेमी फायनलचा सामना हा गुरूवारी दुबईत खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला सहा चेंडू राखून पाच विकेटने नमवले. ऑस्ट्रेलियाच्या या विजयात मैथ्यू वेड आणि मार्कस स्टोइनिस यांची महत्त्वाची भूमिका होती. दोन्ही खेळाडूंनी 40 चेंडूत 81 रणांची बाजी खेळत आपल्या टीमला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
पाकिस्तानने दिले होते 179 धावांचे आवाहन -
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंचने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करून निर्धारित 20 षटकात 4 बाद 176 धावा केल्या. पाकिस्तानचे सलामी फलंदाज मोहम्मद रिजवान आणि फखर जमा यांनी अर्थशतकीय खेळी केली. रिजवानने 52 चेंडूत 67 धावा केल्या. ज्यामध्ये त्याने तीन चौकारासह चार षटकार लगावले होते. त्याने कर्णधार बाबर आजम (34 चेंडूत 39 रन) याच्यासोबत खेळी करून पहिल्या विकेटसाठी 71 रणांची भागिदारी दिली. तर फखर जमा याने (32 चेंडूत नाबाद 55 धावा, तीन चौकार, 4 षटकार) दुसऱ्या विकेटसाठी 72 रणांची भागिदारी दिली. तर ऑस्ट्रेलियाच्या मिशेल स्टार्कने सर्वाधिक दोन तर पॅट कमिन्स आणि झम्पाने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
वेडने तीन षटकार मारून मिळवून दिला ऐतिहासिक विजय -
पाकिस्तानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात खराब झाली होती. शाहीन शाह आफ्रिदीने पहिल्याच षटकात ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंचला तंबूत धाडले होते. फिंच बाद झाल्यावर डेविल वॉर्नर आणि मिशेल मार्श यांनी 35 चेंडूत 51 धावांची भागिदारी केली आणि तेही तंबूत परतले. 100 रनाच्या मध्ये पाच बळी घेतल्याने पाकिस्तानची स्थिती मजबूत झाली होती. मात्र मैथ्यू वेड (41) आणि मार्कस स्टोइनिस (40) यांनी सामना आपल्या बाजूने मजबूत केला. दोघांनीही 40 चेंडूत 81 रणांची भागिदारी केली. वेडने 17 चेंडूत चार षटकार आणि दोन चौकाराची खेळी केली. त्याने 19व्या ओवरमध्ये तीन चेंडूत तीन षटकार मारून ऑस्ट्रेलियाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
फायनलमध्ये न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया आमने-सामने -
टी-20 वर्ल्ड कप 2021च्या फायनल सामन्यात न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे आमने-सामने असणार आहेत. या दोन्ही संघामध्ये टी-20 वर्ल्ड कप 2021 चा विजेता होण्यासाठी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा - T2O WC ENG vs NZ Semifinal : इंग्लंडला नमवत न्यूझीलंडची फायनलमध्ये धडक