ETV Bharat / sports

इम्रान ताहिरची बिग बॅश लीगमधून माघार - इम्रान ताहिर बीबीएल न्यूज

मेलबर्न रेनेगेड्सचे प्रशिक्षक मायकल क्लिंगर म्हणाले की, दुर्दैवाने इम्रान वैयक्तिक कारणास्तव या लीगमध्ये खेळणार नाही. तो एक उत्तम खेळाडू आहे, त्यामुळे हे खूप मोठे नुकसान आहे.

legspinner Imran tahir withdraws from BBL due to personal reasons
इम्रान ताहिरची बिग बॅश लीगमधून माघार
author img

By

Published : Dec 29, 2020, 6:52 AM IST

मेलबर्न - दक्षिण आफ्रिकेचा लेगस्पिनर इम्रान ताहिरने वैयक्तिक कारणास्तव ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीग (बीबीएल) टी-२० स्पर्धेतून माघार घेतली आहे. ताहिर बीबीएलमध्ये मेलबर्न रेनेगेड्सकडून खेळणार होता. यापूर्वी, सिडनी सिक्सर्सचा टॉम करन आणि ब्रिस्बेन हीटचा टॉम बेंटन यांनीही बीबीएलमधून आपली नावे मागे घेतली आहेत.

हेही वाचा - ICC पुरस्कारांवर भारताची मोहोर; विराट- धोनीने पटकावले 'हे' पुरस्कार

मेलबर्न रेनेगेड्सचे प्रशिक्षक मायकल क्लिंगर म्हणाले की, दुर्दैवाने इम्रान वैयक्तिक कारणास्तव या लीगमध्ये खेळणार नाही. तो एक उत्तम खेळाडू आहे, त्यामुळे हे खूप मोठे नुकसान आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथही भारताविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर मालिकेत खेळत असल्याने तोसुद्धा बीबीएलपासून लांब राहणार आहे.

यंदाचा हंगाम हा बीबीएलचा १०वा हंगाम आहे. १० डिसेंबर ते ६ फेब्रुवारीदरम्यान हा हंगाम खेळवला जाणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.