ETV Bharat / sports

आयपीएल २०२०: दिल्ली कॅपिटल्सच्या भेदक गोलंदाजीने राजस्थान रॉयलचे तीन 'तेरा'

author img

By

Published : Oct 14, 2020, 7:20 PM IST

Updated : Oct 15, 2020, 7:22 AM IST

राहुल तेवतियाने अखेरच्या षटकापर्यंत मैदानावर टिकून सामन्यात रंगत आणली. तुषार देशपांडेने केलेल्या भेदक माऱ्याने राजस्थानच्या विजयाला सुरुंग लागला.

DC Vs RR live Update
DC Vs RR live Update

दुबई- गोलंदाजांनी केलेल्या चमकदार कामगिरीने दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सला १३ धावांनी पराभूत केले आहे. राजस्थानचा संघ १४८ धावांपर्यंत मजल मारु शकला. राजस्थानला १६२ धावांचेही आव्हान पेलवले नाही. राजस्थानकडून बेन स्टोक्सने एकाकी झुंज दिली. परंतू दिल्लीच्या गोलंदाजांसमोर त्यांचा टिकाव लागला नाही. हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला.

राहुल तेवतियाने अखेरच्या षटकापर्यंत मैदानावर टिकून सामन्यात रंगत आणली. तुषार देशपांडेने केलेल्या भेदक माऱ्याने राजस्थानच्या विजयाला सुरुंग लागला.

आज आयपीएल २०२० मध्ये दिल्ली कॅपिटल आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात स्पर्धेतील 30 वा सामना खेळण्यात आला. . कर्णधार श्रेयस अय्यर (53) आणि सलामीवीर शिखर धवन (57) यांनी झळकवलेल्या वैयक्तिक अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीने राजस्थानसमोर विजयासाठी 162 धावांचे आव्हान ठेवले. सुरुवातीला दिल्लीला जोफ्रा आर्चरने दोन धक्के देत बॅकफूटवर ढकलले. त्याने पृथ्वीला डावाच्या पहिल्याच चेंडूवर बाद केले. त्यानंतर त्याने अजिंक्य रहाणेला बाद केलं. दिल्लीची अवस्था 2 बाद 10 अशी झाली होती. तेव्हा धवन-अय्यर जोडीने दिल्लीचा डाव सावरला. त्यांच्या खेळीमुळेच दिल्लीला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. जोफ्रा आर्चरने भेदक मारा करत 3 गडी टिपले.

live Update

  • राजस्थानचा निम्मा संघ माघारी
  • रियान पराग १ धावा काढून बाद
  • राजस्थानला चौथा धक्का..संजू सॅमसन २५ धावा काढून बाद
  • राजस्थानला धक्का- कर्णधार स्टिव्ह स्मिथ १ धावा काढून बाद
  • राजस्थानच्या फलंदाजीला सुरुवात...जोस बटलर- बेन स्टोक्स जोडी मैदानात
  • दिल्लीचे राजस्थानपुढे विजयासाठी 162 धावांचे आव्हान
  • दिल्लीच्या २० ओव्हरमध्ये १६१ धावा ७ गडी बाद
  • अ‍ॅलेक्स कॅरी १४ धावा काढून माघारी
  • मार्कस स्टॉइनिस १८ धावा काढून बाद
  • कर्णधार श्रेयस अय्यर ५३ धावा काढून बाद
  • दिल्लीला आणखी एक धक्का, पृथ्वी शॉ शुन्यावर बाद
  • शिखर धवन ५७ धावा काढून बाद
  • शिखर-अय्यरची अर्धशतकी भागीदारी, १० षटकात २ बाद
  • दिल्लीचे अर्धशकत पूर्ण, कर्णधार अय्यर आणि धवनची फटकेबाजी
  • आर्चरचा भेदक मारा, अंजिक्य रहाणे शुन्यावर बाद
  • डावाच्या पहिल्याच चेंडूवर दिल्लीला धक्का, पृथ्वी बाद, जोफ्रा आर्चरने घेतली विकेट
  • दिल्लीची सलामवीर जोडी पृथ्वी शॉ आणि शिखर धवन मैदानात

दोन्ही संघांचा हा आठवा सामना आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल संघाने आतापर्यंत 5 सामने जिंकले असून दोन पराभव स्वीकारले आहेत. त्याच्या खात्यात दहा गुण आहेत. आठ संघांच्या टेबलमध्ये तो दुसर्‍या स्थानावर आहे. त्याचप्रमाणे स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्स संघाने तीन सामने जिंकले आहेत तर चार गमावले आहेत. त्याच्या खात्यात सहा अंक आहेत आणि तो सातव्या क्रमांकावर आहे.

राजस्थान रॉयल्स -

जोस बटलर, बेन स्टोक्स, संजू सॅमसन, अँड्र्यू टाय, कार्तिक त्यागी, स्टिव्ह स्मिथ (कर्णधार), अंकित राजपूत, श्रेयस गोपाल, राहुल तेवतिया जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, महिपाल लोमरोर, ओशाने थॉमस, रियान पराग, यशस्वी जयस्वाल, अनुज रावत, आकाश सिंह, डेव्हिड मिलर, मनन वोहरा, शशांक सिंग, वरुण आरोन, टॉम करन, रॉबिन उथप्पा, अनिरुद्ध जोशी, जोफ्रा आर्चर.

दिल्ली कॅपिटल्स -

श्रेयस अय्यर (कर्णधार), रविचंद्रन अश्विन, शिखर धवन, पृथ्वी शॉ, शिमरॉन हेटमायर, कगिसो रबाडा, अजिंक्य रहाणे, अमित मिश्रा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, संदीप लामिछाने, किमो पॉल, डॅनियल सॅम, मोहित शर्मा , एनरिच नॉर्ट्जे, अ‍ॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), आवेश खान, तुषार देशपांडे, हर्षल पटेल, मार्कस स्टॉइनिस, ललित यादव.

Last Updated : Oct 15, 2020, 7:22 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.