लखनौ - भारतरत्न अटल विहारी वाजपेयी क्रिकेट स्टेडियमवर आज तीसरा आणि अंतिम सामना भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघात खेळवण्यात आला. हा सामना भारताने 9 विकेट राखत जिंकला. या सामन्यात राजेश्वरी गायकवाड यांनी 4 षटकात तीन विकेट घेऊन चमकदार कामगिरी केली असून शेफाली वर्मा यांनी 30 चेंडूंत 60 धावा केल्या.
राजेश्चरी यांच्या नेतृत्वात गोलंदाजांच्या कामगिरीवर भारतीय टीमने दक्षिण आफ्रिकेला ७ बाद ११२ धावांवर थांबवले. भारतीय संघाने 9 विकेट राखत 11 षटकांत हे लक्ष गाठले. या सामन्यात स्मृती मानधना, शफाली वर्मा यांनी लक्षवेधी कामगिरी केली. मालिकावीर पुरस्कार शफालीला देण्यात आला.