पुणे : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली सुपरनोव्हाज संघाने तिसऱ्यांदा महिला टी-20 चॅलेंजचे ( Women's T20 Challenge Final ) विजेतेपद पटकावले आहे. स्पर्धेच्या अंतिम फेरीत सुपरनोव्हाज संघाने रोमहर्षक सामन्यात व्हेलॉसिटीचा चार धावांनी पराभव ( Supernovas won by 4 runs ) केला. या सामन्यात प्रथम खेळताना सुपरनोव्हाजने सात विकेट्स गमावून 165 धावा केल्या. डिआंड्रा डॉटिनने अर्धशतक झळकावले. प्रत्युत्तरात व्हेलॉसिटी संघाला आठ विकेट्सच्या मोबदल्यात 161 धावाच करता आल्या. याआधी सुपरनोव्हासने 2018 आणि 2019 मध्ये टी-20 स्पर्धेचे विजेतेपदही पटकावले होते. त्याचबरोबर, 2020 मध्ये ट्रेलब्लेझर्सची टीम चॅम्पियन बनली होती.
-
C. H. A. M. P. I. O. N. S! 🏆
— IndianPremierLeague (@IPL) May 28, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Congratulations to Team Supernovas - the winner of the #My11CircleWT20C 2022. 🙌 🙌#SNOvVEL pic.twitter.com/5g35zIFeNk
">C. H. A. M. P. I. O. N. S! 🏆
— IndianPremierLeague (@IPL) May 28, 2022
Congratulations to Team Supernovas - the winner of the #My11CircleWT20C 2022. 🙌 🙌#SNOvVEL pic.twitter.com/5g35zIFeNkC. H. A. M. P. I. O. N. S! 🏆
— IndianPremierLeague (@IPL) May 28, 2022
Congratulations to Team Supernovas - the winner of the #My11CircleWT20C 2022. 🙌 🙌#SNOvVEL pic.twitter.com/5g35zIFeNk
लक्ष्याचा पाठलाग करताना व्हेलॉसिटीने ( Velocity ) दमदार सुरुवात केली. दोन षटकांनंतर संघाची धावसंख्या बिनबाद 28 धावा होती. तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर शेफाली वर्मा आठ चेंडूत 15 धावा काढून बाद झाली. पुढच्याच षटकात यास्तिका भाटियाही पॅव्हेलियनमध्ये परतली. तिने नऊ चेंडूत 13 धावा केल्या. किरण नवगिरे शून्यावर बाद झाला तर एन चँथमने सहा धावा केल्या. संघाची धावसंख्या चार गडी बाद 58 अशी झाली. कर्णधार दीप्ती शर्मालाही केवळ दोन धावा करता आल्या.
संघाने 64 धावांत पाच मोठ्या विकेट्स गमावल्या होत्या. यानंतर लॉरा वोल्वार्ट ( Laura Wolwart ) आणि स्नेह राणा यांनी संघाची धुरा सांभाळली. दोघांनी 100 च्या पुढे धावसंख्या नेली. राणा 15 धावा करून लेगस्पिनर अलाना किंगची बळी ठरली. केट क्रॉसने सात चेंडूंत 13 धावा केल्या. त्याचवेळी राधा यादवला खातेही उघडता आले नाही. दरम्यान, वोल्वार्टने 34 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. तिने चार चौकार आणि दोन षटकार मारले. तसेच तिने स्पर्धेतील दुसरे अर्धशतक झळकावले.
-
Winners Are Grinners! ☺️ ☺️@ImHarmanpreet, Captain of Supernovas, receives the #My11CircleWT20C Trophy from the hands of Mr. @SGanguly99, President, BCCI & Mr. @JayShah, Honorary Secretary, BCCI. 👏 🏆 #SNOvVEL pic.twitter.com/ujGbXX4GzB
— IndianPremierLeague (@IPL) May 28, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Winners Are Grinners! ☺️ ☺️@ImHarmanpreet, Captain of Supernovas, receives the #My11CircleWT20C Trophy from the hands of Mr. @SGanguly99, President, BCCI & Mr. @JayShah, Honorary Secretary, BCCI. 👏 🏆 #SNOvVEL pic.twitter.com/ujGbXX4GzB
— IndianPremierLeague (@IPL) May 28, 2022Winners Are Grinners! ☺️ ☺️@ImHarmanpreet, Captain of Supernovas, receives the #My11CircleWT20C Trophy from the hands of Mr. @SGanguly99, President, BCCI & Mr. @JayShah, Honorary Secretary, BCCI. 👏 🏆 #SNOvVEL pic.twitter.com/ujGbXX4GzB
— IndianPremierLeague (@IPL) May 28, 2022
शेवटच्या 2 षटकात 34 धावा करायच्या होत्या -
अलाना किंगने तीन विकेट घेतल्या. पूजा वस्त्राकरने 19 वे षटक टाकायला आली होती. पहिल्या चेंडूवर वोल्वार्टने चौकार मारला. दुसऱ्या चेंडूवर तिने एक धाव घेतली. सिमरनने तिसऱ्या चेंडूवर चौकार ठोकला. चौथ्या चेंडूवर आणखी एक चौकार. 5व्या चेंडूवर चार धावा झाल्या. शेवटच्या चेंडूवर एकही रन आली नाही. आता सहा चेंडूत 17 धावा करायच्या होत्या. त्यावेळी डावखुरी फिरकीपटू सोफी एक्लेस्टोनने ( Left-arm spinner Sophie Ecclestone ) शेवटच षटक घेऊन आली. वोल्वार्टने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. सिमरनने तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. वोल्वार्टने चौथ्या चेंडूवर दोन धावा केल्या. 5व्या चेंडूवर एक धाव घेतली. वोल्वार्ट 40 चेंडूत 65 धावा करून नाबाद राहिली. तिने आपल्या खेळीत पाच चौकार आणि तीन षटकार मारले. सिमरनलाही शेवटच्या चेंडूवर एकच धाव करता आली. 10 चेंडूत 20 धावा केल्यानंतर ती शेवटपर्यंत नाबाद राहिली. एक्लेस्टोनने दोन गडी बाद केले.
-
For her brilliant all-round display in the #My11CircleWT20C Final, Supernovas' Deandra Dottin bagged the Player of the Match award. 👏 👏 #SNOvVEL
— IndianPremierLeague (@IPL) May 28, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Scorecard ▶️ https://t.co/5WAdZVnzRM pic.twitter.com/6CaTyqCG4s
">For her brilliant all-round display in the #My11CircleWT20C Final, Supernovas' Deandra Dottin bagged the Player of the Match award. 👏 👏 #SNOvVEL
— IndianPremierLeague (@IPL) May 28, 2022
Scorecard ▶️ https://t.co/5WAdZVnzRM pic.twitter.com/6CaTyqCG4sFor her brilliant all-round display in the #My11CircleWT20C Final, Supernovas' Deandra Dottin bagged the Player of the Match award. 👏 👏 #SNOvVEL
— IndianPremierLeague (@IPL) May 28, 2022
Scorecard ▶️ https://t.co/5WAdZVnzRM pic.twitter.com/6CaTyqCG4s
तत्पूर्वी, डिआंड्रा डॉटिन ( Diandra Dotin ) (62) आणि कर्णधार हरमनप्रीत कौर (43) यांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर सुपरनोव्हाज संघाने 7 बाद 165 धावा केल्या. दोन जीवदानांचा फायदा घेत डॉटिनने 44 चेंडूंच्या खेळीत एक चौकार आणि चार षटकार ठोकले. हरमनप्रीतने 29 चेंडूंच्या खेळीत एक चौकार आणि तीन षटकार ठोकले. दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी 5.3 षटकांत 58धावांची भागीदारी केली. याआधी डॉटिनने सलामीवीर प्रिया पुनिया (28) सोबत सलामीच्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. व्हेलॉसिटीकडून केट क्रॉस, दीप्ती शर्मा आणि सिमरन बहादूरने 2-2 बळी घेतले.
पहिल्या 6 षटकात 46 धावा -
प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर प्रिया आणि डॉटिनने पहिल्या दोन षटकांत सावध फलंदाजी केल्यानंतर तिसऱ्या षटकात १३ धावा केल्या. क्रॉसच्या या षटकात प्रियाने षटकार मारला, तर डॉटिनने चौकार मारला. कर्णधार दीप्तीच्या पुढच्या षटकात स्नेह राणाने मिडविकेटवर डॉटिनचा सोपा झेल सोडला. डॉटिनने सहाव्या षटकात स्नेहच्या पहिल्या दोन्ही चेंडूंवर षटकार खेचून हा जीवनदान साजरे केले. या षटकात संघाने 15 धावा केल्या, ज्यामुळे पॉवरप्लेमध्ये सुपरनोव्हाजची धावसंख्या कोणतेही नुकसान न होता 46 धावा झाली. 8व्या षटकात सिमरनने डॉटिनला त्याच्याच चेंडूवर अवघड झेल सोडत दुसरे जीवनदान दिले.
-
That Winning Feeling! 👏 👏
— IndianPremierLeague (@IPL) May 28, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
A flurry of emotions as Supernovas beat Velocity in a nail-biting summit clash of the #My11CircleWT20C. 👌 👌 #SNOvVEL
Scorecard ▶️ https://t.co/5WAdZVnzRM pic.twitter.com/y34mEblG02
">That Winning Feeling! 👏 👏
— IndianPremierLeague (@IPL) May 28, 2022
A flurry of emotions as Supernovas beat Velocity in a nail-biting summit clash of the #My11CircleWT20C. 👌 👌 #SNOvVEL
Scorecard ▶️ https://t.co/5WAdZVnzRM pic.twitter.com/y34mEblG02That Winning Feeling! 👏 👏
— IndianPremierLeague (@IPL) May 28, 2022
A flurry of emotions as Supernovas beat Velocity in a nail-biting summit clash of the #My11CircleWT20C. 👌 👌 #SNOvVEL
Scorecard ▶️ https://t.co/5WAdZVnzRM pic.twitter.com/y34mEblG02
33 चेंडूत अर्धशतक पूर्ण -
डॉटिनने यावेळी खाकाला तर प्रियाने सिमरनविरुद्ध षटकार मारून धावगती वाढवली. आणखी एक मोठा शॉट खेळण्याच्या प्रक्रियेत प्रियाने लॉरा वोल्वार्टला झेलबाद केले. तिने 29 चेंडूंच्या खेळीत 2 षटकार ठोकले. या षटकात सिमरनने 2 नो-बॉल केले, परंतु डॉटिनला दोन्ही वेळेस त्याचा फायदा उठवता आला नाही. 11व्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या राधा यादवविरुद्ध फ्री हिटवर षटकार ठोकत डॉटिनने 33 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या हरमनप्रीतने स्नेहच्या षटकात राधाविरुद्ध लागोपाठ दोन षटकार आणि चौकार मारून आपली आक्रमक वृत्ती दाखवून दिली.
-
What a thriller of a final that was! 👍 👍
— IndianPremierLeague (@IPL) May 28, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
The @ImHarmanpreet-led Supernovas held their nerve to edge out the spirited Velocity unit by 4 runs to clinch the #My11CircleWT20C title. 👏 👏 #SNOvVEL
Scorecard ▶️ https://t.co/5WAdZVnzRM pic.twitter.com/ffgAatoM2A
">What a thriller of a final that was! 👍 👍
— IndianPremierLeague (@IPL) May 28, 2022
The @ImHarmanpreet-led Supernovas held their nerve to edge out the spirited Velocity unit by 4 runs to clinch the #My11CircleWT20C title. 👏 👏 #SNOvVEL
Scorecard ▶️ https://t.co/5WAdZVnzRM pic.twitter.com/ffgAatoM2AWhat a thriller of a final that was! 👍 👍
— IndianPremierLeague (@IPL) May 28, 2022
The @ImHarmanpreet-led Supernovas held their nerve to edge out the spirited Velocity unit by 4 runs to clinch the #My11CircleWT20C title. 👏 👏 #SNOvVEL
Scorecard ▶️ https://t.co/5WAdZVnzRM pic.twitter.com/ffgAatoM2A
कर्णधार दीप्तीने 15 व्या षटकात डॉटिनला गोलंदाजी देत व्हेलॉसिटीला दुसरे यश मिळवून दिले. यानंतर खाकाने क्रीझवर आलेल्या पूजा वस्त्राकरला (5) बोल्ड केले. 18व्या षटकात क्रॉसने हरमनप्रीत आणि सोफी एकेल्स्टनला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. दीप्तीने 19व्या षटकात सुने लुसला (3) राधाकरवी झेलबाद केले. अखेरच्या षटकात अलाना किंगने (नाबाद 6) सिमरनच्या चेंडूवर षटकार ठोकत संघाची धावसंख्या 160 च्या पुढे नेली. डावाच्या शेवटच्या चेंडूवर हरलीन देओल (7) बाद झाली.