पुणे : महिला टी-20 चॅलेंजच्या ( Womens T20 Challenge ) यंदाच्या हंगामातील पहिला सामना सोमवारी ट्रेलब्लेझर्स विरुद्ध सुपरनोव्हा ( Trailblazers vs Supernovas ) यांच्यात पार पडला. या सामन्यात सुपरनोव्हाने ट्रेलब्लेझर्स 49 धावांनी पराभव केला. ज्यामध्ये वेगवान गोलंदाज पूजा वस्त्राकरने 12 धावांत चार बळी घेतले. ट्रेलब्लेझर्सची कर्णधार स्मृती मानधना (34), सलामीवीर हेली मॅथ्यूज (18), सोफिया डंकले (1) आणि सलमा खातून (0) यांना दोन वेगवेगळ्या स्पेलमध्ये बाद करून वस्त्राकरने गतविजेत्याच्या फलंदाजीची फळी उद्ध्वस्त केली. इंग्लंडची डावखुरी फिरकीपटू सोफी ऍक्सलटन आणि ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू एलाना किंगने प्रत्येकी दोन बळी घेतले.
-
WHAT. A. WIN! 👏 👏
— IndianPremierLeague (@IPL) May 23, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
The @ImHarmanpreet-led Supernovas seal a clinical 4⃣9⃣-run victory over Trailblazers & pocket two points. 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/FuMg25ovwv #My11CircleWT20C #TBLvSNO pic.twitter.com/vQJxXerxRh
">WHAT. A. WIN! 👏 👏
— IndianPremierLeague (@IPL) May 23, 2022
The @ImHarmanpreet-led Supernovas seal a clinical 4⃣9⃣-run victory over Trailblazers & pocket two points. 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/FuMg25ovwv #My11CircleWT20C #TBLvSNO pic.twitter.com/vQJxXerxRhWHAT. A. WIN! 👏 👏
— IndianPremierLeague (@IPL) May 23, 2022
The @ImHarmanpreet-led Supernovas seal a clinical 4⃣9⃣-run victory over Trailblazers & pocket two points. 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/FuMg25ovwv #My11CircleWT20C #TBLvSNO pic.twitter.com/vQJxXerxRh
विजयासाठी 164 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना ट्रेलब्लेझर्स संघ नऊ गड्यांच्या मोबदल्यात 114 धावाच करू शकला. तत्पूर्वी, सुपरनोव्हासने 163 धावा जोडल्या आणि महिला टी-20 चॅलेंजमध्ये ( Womens T20 Challenge Highest Score ) सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. मंधाना आणि मॅथ्यूजने पहिल्या विकेटसाठी पाच षटकांत 39 धावा जोडल्यामुळे ट्रेलब्लेझर्सची चांगली सुरुवात झाली. यानंतर वस्त्राकरने ट्रेलब्लेझर्सला तिहेरी झटका दिला. आधी तिने पाचव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मॅथ्यूजला बाद केले. यानंतर आठव्या षटकात चार चेंडूंत मंधाना आणि डंकले यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
ट्रेलब्लेझर्सने दहा षटकांत 71 धावांत चार विकेट गमावल्या. यानंतर 11व्या षटकात दोन विकेट पडल्या. दुसऱ्या चेंडूवर ऍक्सलटनने ऋचा घोषला (2) बाद केले, तर अरुंधती रेड्डी खाते न उघडता धावबाद झाली. दुसऱ्या स्पेलमध्ये वस्त्राकरने खातूनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. जेमिमा रॉड्रिग्ज (24) हिने एकट्याने किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला. मात्र 14व्या षटकात मेघना सिंगची शिकार केली. तत्पूर्वी, सुपरनोवाची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि 29 चेंडूत 37 धावा केल्या होत्या.
-
.@Vastrakarp25 scalped 4⃣ wickets & bagged the Player of the Match award as Supernovas beat Trailblazers. 👏 👏
— IndianPremierLeague (@IPL) May 23, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Scorecard ▶️ https://t.co/FuMg25ovwv #My11CircleWT20C #TBLvSNO pic.twitter.com/DQs6W3Y5JK
">.@Vastrakarp25 scalped 4⃣ wickets & bagged the Player of the Match award as Supernovas beat Trailblazers. 👏 👏
— IndianPremierLeague (@IPL) May 23, 2022
Scorecard ▶️ https://t.co/FuMg25ovwv #My11CircleWT20C #TBLvSNO pic.twitter.com/DQs6W3Y5JK.@Vastrakarp25 scalped 4⃣ wickets & bagged the Player of the Match award as Supernovas beat Trailblazers. 👏 👏
— IndianPremierLeague (@IPL) May 23, 2022
Scorecard ▶️ https://t.co/FuMg25ovwv #My11CircleWT20C #TBLvSNO pic.twitter.com/DQs6W3Y5JK
हरलीन देओलने 35 आणि डिआंड्रा डॉटिनने 32 धावा केल्या. अखेरच्या दोन षटकांत मात्र आठ धावांत संघाने नाट्यमयरीत्या पाच विकेट्स गमावल्या. ट्रेलब्लेझर्ससाठी हेली मॅथ्यूजने 3/29 घेतले तर सलमा खातूनने 2/30 विकेट्स घेत शानदार कामगिरी केली. सुपरनोव्हासने चांगली सुरुवात केली आणि पॉवरप्लेमध्ये 58 धावा जोडल्या. डॉटिनने 17 चेंडूत 32 धावा केल्या. तिने तिसऱ्या षटकात रेणुका सिंगला तीन चौकार लगावले आणि या षटकात 14 धावा काढल्या. पाचव्या षटकात ती धावबाद झाली पण तिच्या खेळीत तिने पाच चौकार आणि एक षटकार मारला.
-
It's raining wickets here in Pune!
— IndianPremierLeague (@IPL) May 23, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Trailblazers lose their 4th wicket as Sharmin Akhter departs.
Alana King strikes for Supernovas. 👏 👏
Follow the match ▶️ https://t.co/FuMg25ovwv #My11CircleWT20C #TBLvSNO pic.twitter.com/QOUJ5AVhf1
">It's raining wickets here in Pune!
— IndianPremierLeague (@IPL) May 23, 2022
Trailblazers lose their 4th wicket as Sharmin Akhter departs.
Alana King strikes for Supernovas. 👏 👏
Follow the match ▶️ https://t.co/FuMg25ovwv #My11CircleWT20C #TBLvSNO pic.twitter.com/QOUJ5AVhf1It's raining wickets here in Pune!
— IndianPremierLeague (@IPL) May 23, 2022
Trailblazers lose their 4th wicket as Sharmin Akhter departs.
Alana King strikes for Supernovas. 👏 👏
Follow the match ▶️ https://t.co/FuMg25ovwv #My11CircleWT20C #TBLvSNO pic.twitter.com/QOUJ5AVhf1
सलामीवीर प्रिया पुनिया (22) आठव्या षटकात बाद झाली. देओलने कर्णधार हरमनप्रीतसोबत ( Captain Harmanpreet Kaur ) तिसऱ्या विकेटसाठी 37 धावांची भागीदारी केली. तिने आठव्या षटकात मॅथ्यूजला सलग दोन चौकार ठोकले पण चांगल्या सुरुवातीचे मोठ्या धावसंख्येमध्ये रूपांतर करू शकली नाही. पुनिया बाद झाल्यानंतर कौरने दुसऱ्या टोकाकडून विकेट्स दरम्यान धावगती उच्च ठेवली. 15व्या षटकात सून लूस (10) राजेश्वरी गायकवाडने बाद केले तर अलाना किंगला खातूनने पाच धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. पूजा वस्त्राकर आणि हरमनप्रीत 19व्या षटकात तीन चेंडूंत बाद झाले तर शेवटच्या षटकात तीन विकेट पडल्या.