मुंबई - आयपीएलचा 17 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद ( SRH Vs CSK ) यांच्यात पार पडला. या सामन्यात हैदराबादने चेन्नईवर 8 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. अभिषेक शर्माने केलेल्या दमदार फलंदाजीमुळे ( SRH Abhieshk Sharma ) हैदराबादचा विजय सोपस्कर झाला. हैदराबादचा हंगामातील पहिला विजय तर, चेन्नईला सलग चौथ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.
सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईकडून फलंदाजीसाठी सलामीला ऋतुराज गायकवाड आणि रॉबिन उथप्पा उतरले. मात्र, दोघांनी केवळ सोळा धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी आलेल्या मोईन अलीने 13 चेंडूत 48 धावा केल्या. तर, तिसऱ्या विकेटसाठी अंबाती रायडूने 27 धावा केल्या. शिवम दुबे (3), रविंद्र जाडेजा (23), धोनी (3), ब्राव्हो (3), जॉर्डन (6) नाबाद राहिले. वीस षटकांमध्ये चेन्नईने 154 धावांचा आव्हान हैदराबादला दिले.
-
Abhi-Shook the bowling attack with a blitz that will be remembered. 🔥
— SunRisers Hyderabad (@SunRisers) April 9, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Take a bow, @IamAbhiSharma4. 🧡#CSKvSRH #OrangeArmy #ReadyToRise #TATAIPL pic.twitter.com/Xswb4VoAat
">Abhi-Shook the bowling attack with a blitz that will be remembered. 🔥
— SunRisers Hyderabad (@SunRisers) April 9, 2022
Take a bow, @IamAbhiSharma4. 🧡#CSKvSRH #OrangeArmy #ReadyToRise #TATAIPL pic.twitter.com/Xswb4VoAatAbhi-Shook the bowling attack with a blitz that will be remembered. 🔥
— SunRisers Hyderabad (@SunRisers) April 9, 2022
Take a bow, @IamAbhiSharma4. 🧡#CSKvSRH #OrangeArmy #ReadyToRise #TATAIPL pic.twitter.com/Xswb4VoAat
प्रत्युत्तरात उतलेल्या हैदराबाद संघातून फलंदाजीसाठी अभिषेक शर्मा आणि केन विल्यम्सन ही जोडी सलामीला उतरली. या जोडीने चेन्नईला पहिल्या विकेटसाठी 89 धावा काढल्या. 13 व्या षटकात पहिल्या चेंडूवर विल्यम्सन झेलबाद झाला. त्याने 40 चेंडूत 32 धावा केल्या. तर अभिषेक शर्माने 3 षटकार 5 चौकार लगावत 75 धावा ठोकल्या. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी राहूल त्रिपाठीने 39 धावा तर, अभिषेक शर्मा बाद झाल्यावर तिसऱ्या विकेटसाठी निकोलस पूरनने 5 धावा करत आठ विकेटने चेन्नईवर विजय मिळवला.
हेही वाचा - Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरची बाजी; पृथ्वीराज पाटीलने जिंकली मानाची गदा