मुंबई - आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका या देशातील खेळपट्ट्या, या वेगवान गोलंदाजांना साथ देण्याऱ्या तयार करण्यात येत होत्या. तर दुसरीकडे भारत, श्रीलंका आणि पाकिस्तान या देशातील खेळपट्ट्या या फिरकीला अनुकूल अशा तयार करण्यात येतात. भारताचे महान फलंदाज सुनिल गावसकर यांनी सर्व प्रकारच्या खेळपट्ट्यावर फलंदाजी करत आपली छाप सोडली आहे. पण गावसरकर यांनी सर्वात आव्हानात्मक खेळपट्टीविषयी प्रतिक्रिया दिली आहे.
सुनिल गावसकर एका मुलाखतीत म्हणाले की, सबिना पार्कच्या खेळपट्टीवर खेळताना चेंडू उसळी घेऊन यायचा. मी पर्थमध्ये देखील खेळलो आहे. तसेच गाबामध्ये देखील. तिथे चेंडू स्विंग होऊन येत असे. मी सिडनीच्या पावसाने ओल्या झालेल्या खेळपट्टीवर खेळलो. त्यावर जेफ थॉमसन हे आक्रमक गोलंदाजी करत असत. परंतु, चेन्नईमध्ये सिल्वरस्टर क्लार्कचा चेंडू त्या खेळपट्टीवर अचानक वळत होता. मला वाटतं की ही पिच सर्वात कठिण आणि आव्हानात्मक होती. ज्यावर मी फलंदाजी केली.
दरम्यान, गावसकर यांची गणना दिग्गज खेळाडूंमध्ये करण्यात येते. त्यांनी विना हेल्मेट वेगवान गोलंदाजांचा सामना केला आहे. ते कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा गाठणारे पहिले फलंदाज आहे. त्यांनी ३४ शतकं झळकावली आहेत.
हेही वाचा - मिताली राजने जिंकली चाहत्यांची मने; ६ वर्षीय चिमुकलीला करणार मदत
हेही वाचा - 'हे' दोन भारतीय खेळाडू न्यूझीलंडवर पडतील भारी, डेव्हिड वॉर्नरचे भाकित