पार्ल (दक्षिण अफ्रीका): भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात वनडे मालिकेतील पहिला सामना (South Africa vs India 1st ODI) पार्ल येथे बोलंड पार्क येथे पार पडला. या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने भारतावर 31 धावांनी विजय मिळवला (South Africa beat India by 31 runs). दक्षिण आफ्रिका संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांत 4 गडी गमावून 296 धावा केल्या होत्या. त्यामुळे भारतीय संघाला विजयासाठी 297 धावांचे लक्ष्य मिळाले होते. परंतु भारतीय संघ निर्धारित 50 षटकांत 8 गडी गमावून फक्त 265 धावाचं करू शकला.
त्यामुळे भारतीय संघाचा 31 धावांनी पराभव झाला. तसेच आता दक्षिण आफ्रिका संघाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी (South Africa leads the series 1-0) घेतली आहे. भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेने 297 धावांचे लक्ष्य दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात दमदार झाली. त्यानंतर भारतीय संघाला पहिला धक्का कर्णधार के एल राहुलच्या रुपाने बसला. तो संघाची धावसंख्या 46 असताना बाद झाला.
-
That's that from the 1st ODI.
— BCCI (@BCCI) January 19, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
South Africa win by 31 runs.
Scorecard - https://t.co/PJ4gV8SFQb #SAvIND pic.twitter.com/NrRNxZgMNK
">That's that from the 1st ODI.
— BCCI (@BCCI) January 19, 2022
South Africa win by 31 runs.
Scorecard - https://t.co/PJ4gV8SFQb #SAvIND pic.twitter.com/NrRNxZgMNKThat's that from the 1st ODI.
— BCCI (@BCCI) January 19, 2022
South Africa win by 31 runs.
Scorecard - https://t.co/PJ4gV8SFQb #SAvIND pic.twitter.com/NrRNxZgMNK
त्यानंतर शिखर धवनने सर्वाधिक 79 धावा केल्या. त्याचबरोबर विराट कोहलीने देखील त्याला सुरेख साथ देताना 51 धावांची (Virat and Dhawan half centuries) शानदार खेळी. त्यानंतर दोघे ही बाद झाल्याने भारतीय संघाचा डाव अडचणीत सापडला. तसेच इतर फलंदाजांना फलंदाजी धावा करता आल्या. नाहीत. मात्र शेवटी शार्दूल ठाकूरने एकाकी झुंज (Shardul Thakur Half century) देत 50 धावांवर नाबाद राहिला. त्यामुळे भारतीय संघ निर्धारित 50 षटकांत 8 बाद 265 धावा करू शकला. दक्षिण आफ्रिका संघाकडून गोलंदाजी करताना लुंगी एंगिडी, तबरेज शम्सी आणि अॅन्डिलो फेलोक्वायो यांनी प्रत्येकी दोन बळी घेतली. मारक्रम आणि महाराज यांनी प्रत्येकी एक विकेट्स घेतली. तसेच आपल्या संघाच्या विजयात मोलाची भर टाकली.
तत्पुर्वी नाणेफेक जिंकून आफ्रिका संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिका संघाला पहिला धक्का 4.2 षटकांत संघाची धावसंख्या 19 असताना बसला. जनेमन मलानला वैयक्तिक 6 धावांवर जसप्रीत बुमराहने त्याला तंबूत पाठवले. त्यांना दुसरा धक्का क्विंटन डी कॉकच्या (Quinton de kock) रुपाने 58 धावसंख्येवर बसला. त्याला अश्विनने बाद केले.
तसेच संघाची धावसंख्या 68 असताना मार्क्रम बाद झाला त्याला व्ही अय्यरने बाद केले. मात्र टेम्बा बावुमाने कर्णधारपदाला साजेशी खेळी (Temba Bavuma century) करताना एक बाजू लावून धरली. त्याने 143 चेंडूत 8 चौकार लगावत 110 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. त्यानंतर त्याला देखील बुमराहने बाद केले तसेच दक्षिण आफ्रिका संघाकडून सर्वाधिक धावा करणारा वॅन डेर डुसेन 129 धावांवर नाबाद राहिला (Van der Dussen's unbeaten century). त्याने आपल्या या खेळीत 96 चेंडूचा सामना करताना 9 चौकार आणि 4 षटकार लगावले. त्यामुळे त्याच्या संघाला एवढी मोठी धावसंख्या उभारता आली. त्याचबरोबर डेव्हिड मिलर 2 धावांवर नाबाद राहिला. भारताकडून बुमराहने 2 तर व्ही अय्यर आणि अश्विन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. दक्षिण आफ्रिका संघाने निर्धारित 50 षटकांत 4 गडी गमावून 296 धावांची धावसंख्या उभारली होती.