ETV Bharat / sports

Pink Ball Test :भारत आणि श्रीलंका यांच्यातील गुलाबी चेंडूची कसोटी बंगळुरूमध्ये होणार - बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली - आयपीएल २०२२ स्पर्धा

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील गुलाबी चेंडूचा कसोटी (India v Sri Lanka Pink Ball Test) सामना बंगळुरूमध्ये खेळवला जाणार आहे. याबाबात बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी माहिती दिली आहे.

Sourav Ganguly
Sourav Ganguly
author img

By

Published : Feb 4, 2022, 10:32 AM IST

नवी दिल्ली : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील वनडे आणि टी-20 मालिका (INDv WI ODI and T20 series) पार पडल्यानंतर भारत आणि श्रीलंका संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. याबाबत बोलताना बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (BCCI President Sourav Ganguly) म्हणाले, श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत गुलाबी चेंडूची कसोटी बंगळुरूमध्ये खेळवली जाणार आहे.

फेब्रुवारीच्या अखेरीस आणि मार्चच्या सुरुवातीला भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन टी-20 आणि दोन कसोटी सामन्यांचे आयोजन करणार आहे. तसेच भारतीय संघ गुलाबी चेंडू कसोटी खेळण्याची ही तिसरी वेळ असणार आहे. या अगोदर भारताने नोव्हेंबर 2019 मध्ये कोलकाता येथे बांगलादेशविरुद्ध गुलाबी चेंडूचा कसोटी सामना (Pink ball Test match) खेळला होता. त्यानंतर फेब्रुवारी 2021 मध्ये अहमदाबादमध्ये इंग्लंडविरुद्ध दुसरा गुलाबी चेंडूचा कसोटी सामना पार पडला होता. तसेच विराट कोहली कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीत भारताचा नवा कर्णधार रोहित शर्मा असणार आहे.

कोविड-19 प्रकरणांमुळे परिस्थितीमुळे बिघडून अडथळे येत नाही, तोपर्यंत आयपीएल २०२२ स्पर्धा (IPL 2022 tournament) भारतातच होणार असल्याची पुष्टीही गांगुलीने केली आहे. स्थळांच्या बाबतीत, आम्ही महाराष्ट्र-मुंबई आणि पुणे येथे सामने आयोजित करण्याचा विचार करत आहोत. यावर आम्ही निर्णय घेऊ. तसेच बाद फेरीचे ठिकाणं नंतर ठरवले जातील.

गांगुली पुढे म्हणाले, या वर्षी मे महिन्यात महिला टी-२० चॅलेंज पुन्हा होणार आहे. आशा आहे की, भविष्यात महिला खेळाडूंची संख्या (प्लेअर पूल) वाढवून आम्ही मोठ्या महिला आयपीएलचे आयोजन (Organizing Women's IPL) करू शकू. गांगुली यांना असे वाटले की निवड समितीने कर्णधाराच्या पर्यायांवर दीर्घकाळ निर्णय घ्यावा, ते निवडकर्त्यांवर सोडा. कर्णधारपदाबाबत ते जो काही निर्णय घेतील, आम्ही त्याचे पालन करू.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.