ETV Bharat / sports

Smriti Mandhana : स्मृती मंधानाने 30 धावा करत रचला नवा विक्रम; भारताकडून 'अशी' कामगिरी करणारी तिसरी महिला खेळाडू - Smriti Mandhana new record

हॅमिल्टन येथे झालेल्या सामन्यात भारतीय संघाने 110 धावांच्या मोठ्या फरकाने बांगलादेशवर विजय मिळवला. या सामन्यात स्मृती मंधानाने 30 धावा करताना आंतरराष्ट्रीय सामन्यात एक नवा विक्रम ( Smriti Mandhana new record ) केला आहे. त्याचबरोबर ही कामगिरी करणारी स्मृती मंधाना तिसरी भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.

Smriti Mandhana
Smriti Mandhana
author img

By

Published : Mar 22, 2022, 3:43 PM IST

Updated : Mar 23, 2022, 11:40 AM IST

हॅमिल्टन: आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेतील 22 वा सामना भारत विरुद्ध बांगलादेश संघात पार पडला. हा सामना भारतीय संघाने 110 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत, बांगलादेश संघाला 230 धावांचे लक्ष्य दिले होते. या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात बांगलादेश डाव 119 धावांवर आटोपला. भारताची सलामीवीर स्मृती मंधानाने या सामन्यात एका विक्रमाची नोंद केली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाच हजार धावा करणारी तिसरी भारतीय महिला -

भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 229 धावा केल्या होत्या. यामध्ये भारताच्या सलामीवीर स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा यांनी पहिल्या विकेट्साठी शानदार 74 धावांची भागीदारी केली. ज्यामध्ये स्मृती मंधानाच्या 30 धावांचे योगदान होते. स्मृती मंधानाने या 30 धावा करत आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील 5000 धावांचा टप्पा पार केला आहे. स्मृती मंधाना 5000 धावांचा टप्पा ( 5000 runs of Smriti Mandhana ) पार करणारी भारताची तिसरी महिला खेळाडू ( India's third female player ) ठरली आहे. या अगोदर मिताली राज आणि हरमनप्रीत कौर यांनी पाच हजार धावांचा टप्पा पार केला आहे.

स्मृती मंधानाची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द -

स्मृती मंधानाने आपल्या कारकिर्दीत 70 एकदिवसीय, 4 कसोटी आणि 84 टी-20 सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधितव केले आहे. ज्यामध्ये तिने अनुक्रमे 2717, 325 आणि 1971 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये मंधानाने 5, तसेच कसोटी क्रिकेटमध्ये एक शतक केले आहे. टी-२० क्रिकेटमध्ये तिची सर्वोत्तम धावसंख्या 86 धावा आहेत.

हेही वाचा : Icc Women's World Cup: भारताचा बांगलादेशवर 110 धावांनी दणदणीत विजय; उपांत्य फेरीचा मार्ग सुकर

Last Updated : Mar 23, 2022, 11:40 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.