ETV Bharat / sports

ICC T20 RANKINGS : आयसीसी टी-20 क्रमवारीत शफाली वर्मा पहिल्या स्थानी विराजमान - आयसीसी गोलंदाजांची रॅंकीग

भारताची युवा सलामीवीर शफाली वर्मा पुन्हा एकदा ICC महिला T20 आंतरराष्ट्रीय फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचली आहे. दुसरीकडे स्मृती मानधना (Opener Smriti Manadhana) हिला एका स्थानाने नुकसान झाले आहे.

SHAFALI VERMA
SHAFALI VERMA
author img

By

Published : Jan 26, 2022, 10:56 AM IST

नवी दिल्ली: भारताची सलामीवीर शफाली वर्मा (India's opener Shafali Verma) मंगळवारी जाहीर करण्यात आलेल्या महिलांच्या ताज्या आयसीसी टी-20 रॅंकींगमध्ये पहिल्या अव्वलस्थानी पोहचली आहे. शफाली वर्माने ऑस्ट्रेलियाच्या बेथ मूनीला मागे टाकत हे स्थान काबीज केले आहे. आयसीसीच्या टी-20 रॅंकिंग मध्ये प्रथम क्रमांकाचे स्थान पटकावणारी शफाली ही बेथ मूनीच्या पुढे दोन अंकांनी आहे.

ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंग (Australia captain Meg Lanning) आणि ताहलिया मॅकग्राथने एडिलेड मधील पहिल्या सामन्यात शानदार कामगिरी करत टी-20 रॅंकिंगमध्ये पुढे गेली आहे. या दोघींनी इंग्लंड विरुद्धच्या टी-20 मालिकेत शानदार प्रदर्शन केले होते.

ताज्या अपडेटटनुसार क्वालालंपूर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या पाच संघांच्या आयसीसी राष्ट्रकुल खेळांच्या पात्रता 2022 मधील कामगिरीचा समावेश आहे. श्रीलंकेची कर्णधार चामारी अथापथूने स्पर्धेत 221 धावा केल्याने सहा स्थानांनी प्रगती करत आठव्या क्रमांकावर पोहोचली आहे. बांगलादेशची मुर्शिदा खातून एकूण 126 धावांनंतर 35 स्थानांच्या फायद्याने 48व्या स्थानावर पोहोचली आहे.

इंग्लेडची सलामी फलंदाज डॅनी वॅट (70) आणि टॅमी ब्यूमोंट (30) (जे पहिल्या सामन्यातील 82 धावांच्या भागीदारीशी संबंधित आहे ) देखील प्रगती केली आहे. वॅट तीन स्थांनाच्या फायद्याने 13 व्या आणि ब्यूमोंट दोन स्थांनानी उडी घेत 16 व्या स्थानी पोहचली आहे. तसेच कर्णधार हीथर नाइट सुध्दा त्यांच्याबरोबर पहिल्या 20 जणांमध्ये सहभागी आहे.

अथापथूने न्यूझीलंडच्या सोफी डिवाईनच्या नेतृत्वाखालील अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत एका स्थानाने प्रगती करत सातवे स्थान काबीज केले. दुसऱ्या बाजूला आयसीसी गोलंदाजांच्या रॅंकीगमध्ये (ICC Bowling Rankings) पहिल्या तीन स्थानांमध्ये काही बदल झालेला नाही. ज्यामध्ये इंग्लंडची सोफी एक्लेस्टोन आणि सारा ग्लेन अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. तर तिसऱ्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेची शबनीम इस्माईल आहे. भारताच्या दीप्ती शर्माने ऑस्ट्रेलियाच्या मेगन शुटवर मागे टाकत चौथे स्थान पटकावले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.