नवी दिल्ली: क्रिकेट जगताचा बादशहा असलेल्या सचिन तेंडुलकरबाबत आता नवा खुलासा झाला आहे. सचिन तेंडुलकरचा हा खुलासा भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्रा आणि माजी भारतीय वेगवान गोलंदाज आरपी सिंग यांनी केला. दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या SA20 स्पर्धेत समालोचन करताना त्यांनी हा किस्सा सांगितलं. यावर सचिन तेंडुलकरनेही ट्विट केले आहे. सचिनच्या ट्विटनंतर सप्टेंबर 2006 मध्ये खेळलेला भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामना आठवला. ज्यामध्ये सचिन कोणतीही चूक न करता बाद झाला होता.
माजी भारतीय क्रिकेटर आकाश चोप्रा आणि आरपी सिंह दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० लीगमध्ये कॉमेंट्री करत आहेत. यादरम्यान, एका फलंदाजाने सामन्यात स्ट्रेट ड्राइव्ह हा शॉट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू गोलंदाजाला आदळला आणि विकेटवर गेला. यादरम्यान, नॉन-स्ट्रायकर खेळाडू क्रीजच्या बाहेर असल्याने त्या खेळाडूला रनआउट देण्यात आले. हे सर्व पाहून आकाश चोप्राने कमेंट करताना आरपी सिंगला प्रश्न विचारला.
-
For once, the straight drive wasn’t my favorite shot! @cricketaakash @rpsingh bhaiyya toh batting karte samay bhi wicket lete the!😜 https://t.co/azwZ1jf1eB
— Sachin Tendulkar (@sachin_rt) January 20, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">For once, the straight drive wasn’t my favorite shot! @cricketaakash @rpsingh bhaiyya toh batting karte samay bhi wicket lete the!😜 https://t.co/azwZ1jf1eB
— Sachin Tendulkar (@sachin_rt) January 20, 2023For once, the straight drive wasn’t my favorite shot! @cricketaakash @rpsingh bhaiyya toh batting karte samay bhi wicket lete the!😜 https://t.co/azwZ1jf1eB
— Sachin Tendulkar (@sachin_rt) January 20, 2023
आकाश चोप्राने विचारले की, 'या सारखे कौशल्य कुठे आहे? तुम्ही कधी असे काही केले आहे का? यावर आरपी सिंगने लगेच उत्तर दिले, 'मी फॉलो-थ्रूमध्ये अशाप्रकारे कोणत्याही खेळाडूला बाद केले नाही. पण एकदा मी फलंदाजी करत होतो. मी स्ट्रेट ड्राइव्ह मारला आणि समोरचा फलंदाज बाद झाला. यावर थोडेसे हसत आकाश चोप्राने नॉन स्ट्रायकरला असलेल्या खेळाडूचे चे नाव विचारले. ज्याला उत्तर देताना आरपी सिंह म्हणाला, 'सचिन तेंडुलकर.
सिंग म्हणाला की, यावेळी मी सचिनला सॉरीही म्हटलं होतं. मी म्हणालो, 'माझ्या बॅटला चेंडू लागत नाही, जर असा आदळला तर माफ करा'. यानंतर आकाश चोप्रा म्हणाला की, 'पाजी (सचिन) त्याच्या (आरपी सिंग) वतीने मी तुम्हाला पुन्हा एकदा सॉरी म्हणत आहे. आकाश चोप्रानेही हे ट्विट केले आहे. ज्याच्या प्रत्युत्तरात सचिनने ट्विट करत आरपी सिंगचीही मजा घेतली. सचिनने ट्विट करून लिहिले, 'तो असाच एक प्रसंग होता जेव्हा स्ट्रेट ड्राइव्ह हा माझा आवडता शॉट राहिला नाही! आरपी भैया फलंदाजी करतानाही विकेट घेत असे.
2006 च्या महिन्यात या सामन्याचा उल्लेख आहे, DLF कप दरम्यान भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्या 5 व्या एकदिवसीय सामन्यात, आरपी सिंगने मार्लोन सॅम्युअल्सच्या षटकात सरळ ड्राइव्ह मारला होता. पण चेंडू विंडीजच्या गोलंदाजावर आदळला आणि थेट विकेटवर गेला आणि क्रिजच्या बाहेर गेल्यावर नॉन स्ट्रायकर सचिन धावबाद झाला. या ट्विटद्वारे सचिन तेंडुलकरने सांगितले की, स्टेट ड्राईव्ह हा त्याचा आवडता शॉट आहे.