केपटाउन : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तिसरा कसोटी ( SAvIND 3rd Test ) सामना मंगळवारी खेळला जाणार आहे. तत्पुर्वी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने ( South Africa captain Dean Elgar ) सोमवारी सांगितले की, जर त्याच्या संघाने भारताविरुद्धची तिसरी कसोटी आणि मालिका जिंकली तर हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा विजय असणार आहे. न्यूलँड्स येथे मंगळवारपासून सुरू होणारी निर्णायक तिसरी कसोटी दक्षिण आफ्रिकेसाठी गेल्या 10 किंवा 15 वर्षांतील सर्वात मोठी कसोटी ठरणार असल्याचे डीन एल्गर म्हणाला.
सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका मालिकेत 1-1 ने बरोबरीत आहेत. त्यामुळे तिसरा कसोटी सामना खेळण्यास दोन्ही संघ केपटाऊनमध्ये ( Third Test match in Cape Town ) सज्ज आहेत. "जर आम्ही भारताला केपटाऊनमध्ये पराभूत केले तर हा माझ्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वात मोठा कसोटी विजय असेल," असे एल्गर म्हणाला. त्याचवेळी, खेळाडूंच्या दृष्टीकोनातून, आमच्यासाठी हा खूप मोठा सामना असेल. आम्ही गेल्या काही महिन्यांपासून खूप मेहनत घेत आहोत आणि आतापर्यंत खूप चांगले क्रिकेट खेळलो आहोत. आमच्यासोबत बर्याच गोष्टी ठीक होत नव्हत्या. परंतु आता हळूहळू ते योग्य केले जात आहे आणि आम्ही शक्य तितके सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करत आहोत."
एल्गरने जोहान्सबर्ग कसोटीत दक्षिण आफ्रिकेला ( South Africa won the Johannesburg Test ) 96 धावांची शानदार नाबाद पारी खेळून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. भारताला २-१ ने पराभूत करणे ही आपल्या संघासाठी मोठी उपलब्धी असेल, असे त्याने आवर्जून सांगितले. एक संघ म्हणून, आम्ही शेवटच्या कसोटीत काय केले हे लक्षात ठेवून आम्हाला अधिक चांगले करणे आवश्यक आहे."
तो पुढे म्हणाला, "आम्ही भविष्याचा विचार करत नाही. आम्ही फक्त वर्तमानावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे आम्ही या सामन्यात अधिक चांगली कामगिरी करू. मागील सामन्याप्रमाणे आमच्यासाठी मालिका २-१ ने जिंकणे ही आमच्यासाठी मोठी गोष्ट असणार आहे. आमच्यासाठी जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाच्या संघाला घरच्या मैदानावर पराभूत करणे ही मोठी गोष्ट असेल. ही कसोटी 10 किंवा 15 वर्षांतील सर्वात मोठा सामना ठरणार आहे. मला वाटते की ते आमच्या सन्मानासाठी आहे. कसोटी क्रिकेटमध्ये हा वेग नेहमीच असायला हवा. एक खेळाडू म्हणून मी देखील असे काहीतरी पाहण्याचा प्रयत्न करतो, ज्यामुळे संघाला यश मिळत राहते. त्यामुळे जर आम्ही ते पुन्हा करू शकलो नाही, तर ती आमच्यासाठी खूप वाईट गोष्ट असेल."
हेही वाचा : In Dv Sa 3rd Test : तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी विराट कोहली सज्ज ; मोहम्मद सिराजची माघार