ETV Bharat / sports

मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडचं वादळी शतक गेलं वाया - Ruturaj Gaikwad century in India vs Australia

IND Vs AUS 3rd T20 : ऋतुराज गायकवाडच्या शतकाच्या जोरावर भारतानं निर्धारित 20 षटकात तीन गड्यांच्या मोबदल्यात 222 धावांचा डोंगर उभा केला.

Ruturaj Gaikwad
Ruturaj Gaikwad
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 28, 2023, 10:59 PM IST

गुवाहाटी IND Vs AUS 3rd T20 : तिसरा T20 सामना बारसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहटीत गेला. यावेळी ऋतुराज गायकवाडनं नाबाद 123 धावा केल्या. त्यानं सामन्यात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिलं शतक ठोकलंय. याआधी विराट कोहली, रोहित शर्मा, सुरेश रैना यांना देखील ऑस्ट्रेलियाविरूद्ध टी-20 मध्ये शतक ठोकता आलं नव्हतं. ऋतुराज गायकवाडच्या शतकाच्या बळावर भारतानं निर्धारित 20 षटकांत 222 धावांचा डोंगर उभा केला. टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव यांनी छोट्या खेळी करत धावसंख्या वाढवली. भारतानं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 223 धावांचं आव्हान ठेवलं होतं.

दोन फलंदाज अवघ्या 24 धावांत बाद : ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेडनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली. भारताचे आघाडीचे दोन फलंदाज अवघ्या 24 धावांत माघारी परतले. यशस्वी जैस्वाल सहा धावा करून बाद झाला, तर इशान किशनला खातंही उघडता आलं नाही. दोन विकेट गमवल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवनं ऋतुराजच्या साथीनं भारताचा डाव सावरला.

तिसऱ्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी : सूर्यकुमार यादव आणि ऋतुराज गायकवाड यांनी तिसऱ्या विकेटसाठी 47 चेंडूंत 57 धावांची भागीदारी केली. यावेळी सूर्यकुमार यादव जोरदार फलंदाजी करत होता, तर ऋतुराज संयमी खेळत होता. सूर्यकुमार यादवनं 29 चेंडूंत दोन षटकार आणि पाच चौकारांच्या मदतीनं 39 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

ऋतुराजनं 52 चेंडूत ठोकलं शतक : कर्णधार तंबूत परतल्यानंतर ऋतुराज गायकवाडनं सूत्रं हाती घेतील. ऋतुराज गायकवाडनं टिळक वर्मासोबत धावसंख्या वेगानं वाढवली. त्यानंतर ऋतुराज आणि टिळक वर्मा यांनी शतकी भागीदारी रचली. ऋतुराज गायकवाडनं T20 मध्ये पहिले शतक ठोकले. ऋतुराजनं 52 चेंडूत षटकार ठोकत शतक झळकावलं.

हेही वाचा -

  1. सुनील गावसकर पोहोचले 'सचीन' रेल्वे स्थानकावर! फोटो व्हायरल; जाणून घ्या कुठे आहे हे स्टेशन
  2. Ind Vs Aus T20 : ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २२३ धावांचं लक्ष्य, ऋतुराज गायकवाडचं तुफानी शतक
  3. भारताचा युवा 'प्रिन्स', गुजरातचा नवा कर्णधार; जबाबदारी घेताच काय म्हणाला गिल?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.