ETV Bharat / sports

Rohit Sharma post:रोहित शर्माने पोस्ट केलेल्या 'या' फोटोवर होतोय कमेंट्स आणि लायक्सचा पाऊस

author img

By

Published : Jan 28, 2022, 1:43 PM IST

रोहित शर्माने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट (Rohit Sharma's Instagram post) शेअर केली आहे. ज्यावर त्याचे चाहते व्यक्त होताना कमेंट्स आणि लायक्सचा वर्षाव करत आहेत.

Rohit Sharma
Rohit Sharma

नवी दिल्ली: भारतीय मर्यादीत षटकांच्या संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Captain Rohit Sharma) वेस्टइंडीज विरुद्ध होणाऱ्या वनडे आणि टी-20 मालिकेत पुनरागमन करणार आहे. तो या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसून येणार आहे. या अगोदरच आता रोहित शर्मा चर्चेत आला आहे. याचे कारण आहे त्याने सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट. रोहित शर्माने आपली पत्नी रितीका सोबत एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

34 वर्षीय रोहित शर्मा आपली पत्नी रितिका सोबत या फोटोत हसताना दिसत आहे. ही पोस्ट रोहित शर्माच्या चाहत्यांना खुप आवडली (Fans liked Rohit Sharma's post) आहे. तसेच या पोस्टवर त्याचे चाहते लायक्स आणि कमेंट्सचा भडीमार करत आहेत. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये रोहित शर्माने लिहिले आहे की, माझे घर.

दरम्यान रोहित शर्मा हा दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाऊ शकला नव्हता. त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. त्यामुळे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिकेला रोहित शर्मा मुकला होता. तसेच आता वेस्टइंडीज संघ भारत दौऱ्यावर (West Indies tour of India) येत आहेत. ज्यामध्ये वनडे आणि टी-20 मालिकेचा समावेश आहे. ज्यामध्ये भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसून येणार आहे.

भारत विरुद्ध वेस्टइंडीज संघात 6 फेब्रुवारी पासून तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. तसेच या दोन संघातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेला त्यानंतर सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी बीसीसीआयने वनडे आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा (BCCI announces ODI and T20 squads) केली आहे.

टी-20 संघ -

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवि बिश्नोई, अक्षर पटेल, यजुवेंद्र चहल, वॉशिंगटन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वरकुमार, आवेश खान, हर्षल पटेल.

एकदिवसीय संघ -

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (विकेटकिपर), दीपक चहर, शार्दुल ठाकूर, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.