पुणे : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर बुधवारी झालेल्या आयपीएल 2022 (IPL 2022 ) च्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने, पॅट कमिन्सच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर मुंबई इंडियन्सचा पाच गडी राखून पराभव केला. हा मुंबई इंडियन्स संघााचा यंदाच्या स्पर्धेतील सलग तिसऱ्या सामन्यातील सलग तिसरा पराभव होता. त्यामुळे मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्माने आपल्या संघाच्या खराब कामगिरीमुळे निराशा ( Rohit Sharma disappointed with team performance ) व्यक्त केली आहे.
-
Pat Cummins finishes things off in style!
— IndianPremierLeague (@IPL) April 6, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Also brings up the joint fastest half-century in #TATAIPL off 14 deliveries.#KKR win by 5 wickets with 24 balls to spare.
Scorecard - https://t.co/22oFJJzGVN #KKRvMI #TATAIPL pic.twitter.com/r5ahBcIWgR
">Pat Cummins finishes things off in style!
— IndianPremierLeague (@IPL) April 6, 2022
Also brings up the joint fastest half-century in #TATAIPL off 14 deliveries.#KKR win by 5 wickets with 24 balls to spare.
Scorecard - https://t.co/22oFJJzGVN #KKRvMI #TATAIPL pic.twitter.com/r5ahBcIWgRPat Cummins finishes things off in style!
— IndianPremierLeague (@IPL) April 6, 2022
Also brings up the joint fastest half-century in #TATAIPL off 14 deliveries.#KKR win by 5 wickets with 24 balls to spare.
Scorecard - https://t.co/22oFJJzGVN #KKRvMI #TATAIPL pic.twitter.com/r5ahBcIWgR
रोहित शर्मा म्हणाला, संघाने नीट फलंदाजी आणि गोलंदाजी केली नाही, त्यामुळे आम्ही हा तिसरा सामनाही गमावला. पॅट कमिन्स अशी खेळी करेल, अशी आम्हाला अपेक्षा नव्हती. त्यामुळे या विजयाचे श्रेय आम्ही त्याला देतो. जसजसा खेळ पुढे सरकत गेला, तसतशी खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली होत गेली. मात्र, अखेरच्या पाच षटकांत ७६ धावा केल्याबद्दल मुंबई इंडियन्सच्या कर्णधाराने संघाच्या फलंदाजांचे कौतुक केले. सूर्यकुमार यादवचे अर्धशतक ( Suryakumar Yadav's half century ) आणि तिलक वर्माच्या नाबाद 38 आणि कायरॉन पोलार्डच्या पाच चेंडूत केलेल्या 22 धावांच्या जोरावर संघाला 150 धावांचा टप्पा पार करता आला.
शर्मा पुढे म्हणाले, एकूणच ही खेळपट्टी चांगली होती. आमची फलंदाजी चांगली झाली नाही, पण शेवटच्या 4-5 षटकांत खेळाडूंनी ज्या प्रकारे धावा केल्या, ते कौतुकास्पद आहे. पण त्यांनी सुरुवातीला आक्रमकता दाखवली असती, तर आम्ही सामना जिंकू शकलो असतो. कर्णधाराने असेही सांगितले की, “आम्ही ठरल्याप्रमाणे गोलंदाजी केली नाही. कमिन्सच्या शानदार फलंदाजीमुळे ( Cummins' superb batting ) सामना 16 व्या षटकात संपला."
-
Player of the Match is none other than @patcummins30 for his stupendous knock of 56* off just 15 deliveries as @KKRiders win by 5 wickets.
— IndianPremierLeague (@IPL) April 6, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Scorecard - https://t.co/22oFJJzGVN #KKRvMI #TATAIPL pic.twitter.com/0WI5Y81XgL
">Player of the Match is none other than @patcummins30 for his stupendous knock of 56* off just 15 deliveries as @KKRiders win by 5 wickets.
— IndianPremierLeague (@IPL) April 6, 2022
Scorecard - https://t.co/22oFJJzGVN #KKRvMI #TATAIPL pic.twitter.com/0WI5Y81XgLPlayer of the Match is none other than @patcummins30 for his stupendous knock of 56* off just 15 deliveries as @KKRiders win by 5 wickets.
— IndianPremierLeague (@IPL) April 6, 2022
Scorecard - https://t.co/22oFJJzGVN #KKRvMI #TATAIPL pic.twitter.com/0WI5Y81XgL
मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने ( Head Coach Mahela Jayawardene ) यांनी सामन्यानंतर सांगितले की, फलंदाजीच्या डावाच्या शेवटच्या काही षटकांमध्ये जास्तीत जास्त विकेट्स मिळविण्यासाठी एमआयने कसे चांगले नियोजन केले हे आम्हाला माहित आहे. मात्र या योजनेनुसार जाण्यात संघ अपयशी ठरला.
ते पुढे म्हणाले, संघाचे सलग तीन पराभव झाले असून, संघाला पहिला विजय लवकर मिळावा अशी आमची इच्छा आहे. पहिला विजय मिळाल्यास संघ आगामी सर्व सामन्यांमध्ये विजय कायम ठेवू शकेल. त्याचवेळी ते पुढे म्हणाले की, तिलक वर्मा ( Tilak Verma ) सारखे युवा खेळाडू संघात जबरदस्त फॉर्ममध्ये दिसले आणि ब्रेव्हिसने पदार्पणाच्या सामन्यात चांगली कामगिरी केली.