ETV Bharat / sports

Rohit Sharma Run In International Cricket : सचिन आणि कोहलीच्या क्लबमध्ये रोहित शर्माची एन्ट्री

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादमध्ये सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात कर्णधार रोहित शर्माने एक मोठी कामगिरी आपल्या नावावर केली आहे. आता रोहित शर्मा सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.

Rohit Sharma Run In International Cricket
रोहित शर्मा
author img

By

Published : Mar 11, 2023, 2:33 PM IST

नवी दिल्ली : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा शेवटचा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादमध्ये खेळला जात आहे. चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी शुभमन गिलने रोहित शर्मासोबत क्रीझवर सलामी दिली. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने या डावात मोठी कामगिरी केली आहे. रोहित आणि शुभमनच्या जोडीने विकेट्स गमावून टीम इंडियाची धावसंख्या 36 वरून 74 धावांपर्यंत वाढवली आहे. तिसर्‍या भारतीय संघाने 74 धावांवर आपली एक विकेट गमावली आहे. ऑस्ट्रेलियन गोलंदाज मॅथ्यू कुह्नेमनने रोहित शर्माला बोल्ड केले. रोहित 35 धावांवर बाद झाला.

7वा भारतीय खेळाडू : चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी रोहित शर्माने २१ धावा केल्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १७ हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा रोहित शर्मा हा 7वा भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये विराट कोहलीसह माजी भारतीय आणि दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग आणि महेंद्रसिंग धोनी यांनी १७ हजारांचा आकडा गाठला आहे. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 34357 धावा करण्याचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. आता या यादीत रोहित शर्माचाही समावेश झाला आहे.

आतापर्यंतची कारकीर्द कशी राहिली : रोहित शर्माने 148 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. रोहितने विविध सामन्यात 140 डावांमध्ये 3853 धावा काठल्या. यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 118 आहे. त्‍याने टी-20 आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्‍ये 4 शतके आणि 29 अर्धशतके झळकावली आहेत. याशिवाय त्याने 407 सामन्यांच्या 394 डावांमध्ये 10703 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 6 शतके आणि 72 अर्धशतके केली आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माने 241 सामन्यांच्या 234 डावांमध्ये 9782 धावा केल्या आहेत. रोहितची वनडेतील सर्वोच्च धावसंख्या २६४ धावा आहे. यामध्ये त्याने 30 शतके आणि 48 अर्धशतके केली आहेत. आता १७ हजार धावा करणारा, रोहीत शर्मा हा 7वा भारतीय खेळाडू ठरला आहे.

हेही वाचा : IND vs AUS : अश्विनने रचला इतिहास, बॉर्डर गावस्कर ट्रॉफी, कुंबळेचा विक्रम मोडला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.