ETV Bharat / sports

IPL २०२१ : रविंद्र जडेजाचा भरमैदानात डान्स, पाहा व्हिडिओ - Ravindra Jadeja Celebration VIDEO

शनिवारी झालेल्या सामन्यात सर जडेजाने अष्टपैलू खेळी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जडेजाने या सामन्यात चार झेल आणि दोन महत्त्‍वाच्या विकेट घेतल्यावर सामन्याच्या चांगलाच आनंद घेतला. जडेजाने राजस्थानच्या उनाडकटचा चौथा झेल घेतल्यावर तो चांगलाच रंगात येत मैदानावरच आपल्या शैलीत डान्स करू लागला.

Ravindra Jadejas Unique Celebration Goes Viral After Chennai Super Kings Beat Rajasthan Royals in IPL 2021
IPL २०२१ : रविंद्र जडेजाचा भरमैदानात डान्स, पाहा व्हिडिओ
author img

By

Published : Apr 20, 2021, 1:48 PM IST

मुंबई - आयपीएलच्या चौदाव्या मोसमात सोमवारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने फिरकीच्या जोरावर राजस्थान रॉयल्स संघावर मोठा विजय नोंदवला. चेन्नईच्या विजयात मोईन अली आणि रविंद्र जडेजाने मोलाचे योगदान दिले.

चेन्नईने या सामन्यात प्रथम फलंदाजी करत १८९ धावांचे राजस्थानसमोर लक्ष ठेवले होते. प्रत्युत्तरादाखल राजस्थानला १४३ धावांपर्यंत मजल मारता आली. जडेजाने या सामन्या दरम्यान महत्वाच्या दोन विकेटसह चार झेल टिपले. यादरम्यान, जडेजाच्या सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

शनिवारी झालेल्या सामन्यात सर जडेजाने अष्टपैलू खेळी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जडेजाने या सामन्यात चार झेल आणि दोन महत्त्‍वाच्या विकेट घेतल्यावर सामन्याच्या चांगलाच आनंद घेतला. जडेजाने राजस्थानच्या उनाडकटचा चौथा झेल घेतल्यावर तो चांगलाच रंगात येत मैदानावरच आपल्या शैलीत डान्स करू लागला. जडेजा डान्स करताना चार आकडा दाखवत कोणाला तरी कॉल करत असल्याचे तो दाखवत होता.

जडेजाच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आयपीएलने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन देखील हा व्हिडीओ शेअर केला आहे. जडेजाच्या डान्स व्हिडिओवर चाहते लाईक कमेंटचा पाऊस पाडत आहेत.

हेही वाचा - IPL २०२१ : गतविजेते-उपविजेते यांच्यात आज कडवी झुंज

हेही वाचा - IPL २०२१ : 'बॉल सूखा है घूमेगा', चाणाक्ष धोनीची कमाल आणि राजस्थान पराभव

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.