लंडन : टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये खास कामगिरी केली आहे. मॅचच्या तिसऱ्या दिवशी त्याने एक रेकॉर्ड आपल्या नावे केला. अशी कामगिरी करणारा तो देशातील सर्वोत्तम डावखुरा फिरकी गोलंदाज बनला आहे. स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेडला बाद करून जडेजा प्रसिद्ध फिरकीपटू बिशनसिंग बेदीच्या पुढे गेला आहे.
-
Most wicket as a left-arm spinner for India in Tests - Jadeja.
— Johns. (@CricCrazyJohns) June 10, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Most wickets as a left arm spinner for India in ODI - Jadeja.
Most wickets as a left arm bowler for India in T20I - Jadeja. pic.twitter.com/4Je0QgnfOE
">Most wicket as a left-arm spinner for India in Tests - Jadeja.
— Johns. (@CricCrazyJohns) June 10, 2023
Most wickets as a left arm spinner for India in ODI - Jadeja.
Most wickets as a left arm bowler for India in T20I - Jadeja. pic.twitter.com/4Je0QgnfOEMost wicket as a left-arm spinner for India in Tests - Jadeja.
— Johns. (@CricCrazyJohns) June 10, 2023
Most wickets as a left arm spinner for India in ODI - Jadeja.
Most wickets as a left arm bowler for India in T20I - Jadeja. pic.twitter.com/4Je0QgnfOE
बिशनसिंग बेदींचा विक्रम मोडला : रवींद्र जडेजा भारतीय संघाचे दिग्गज खेळाडू बिशनसिंग बेदी यांचा विक्रम मोडीत काढत त्यांच्या पुढे गेला आहे. बिशनसिंग बेदीने यांनी 67 कसोटी सामन्यात 266 विकेट घेतल्या आहेत. तर रवींद्र जडेजाच्या नावावर आता 65 कसोटी सामन्यात 267 विकेट्स आहेत. अशाप्रकराने जडेजा भारताकडून सर्वाधिक कसोटी विकेट घेणारा डावखूरा फिरकीपटू बनला आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध 296 धावांची भक्कम आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 4 गडी गमावले आहेत.
तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा डावखुरा फिरकी गोलंदाज : ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात दुसरा बळी घेताच जडेजा टेस्ट क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक बळी घेणार डावखुरा गोलंदाज बनला आहे. विशेष म्हणजे, जडेजा एकदिवसीय आणि टी - 20 सामन्यांमध्ये देखील टीम इंडियाकडून सर्वाधिक विकेट घेणारा डावखुरा फिरकी गोलंदाज आहे. रवींद्र जडेजाने 174 एकदिवसीय सामन्यांमध्ये 191 बळी घेतले आहेत, तर त्याने 64 टी - 20 सामन्यांमध्ये 51 विकेट घेतल्या आहेत. अशाप्रकारे आता तो भारताकडून क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा डावखुरा फिरकी गोलंदाज बनला आहे.
हे ही वाचा :