ETV Bharat / sports

Ramiz Raja Statement : रमीझ राजा बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यासोबत 'या' स्पर्धेबाबत करणार चर्चा

दुबई येथे आशियाई क्रिकेट परिषदेची बैठक होणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख रमीझ राजा हे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यासोबत चार देशांच्या एकदिवसीय स्पर्धेच्या ( Four-Country ODI tournament ) प्रस्तावावर चर्चा करणार आहेत.

Ramiz Raja
Ramiz Raja
author img

By

Published : Mar 15, 2022, 7:38 PM IST

कराची : 19 मार्चला दुबई येथे आशियाई क्रिकेट परिषदेची बैठक ( Meeting of the Asian Cricket Council ) होणार आहे. या बैठकीत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख रमीझ राजा हे चार देशांच्या एकदिवसीय स्पर्धेच्या प्रस्तावाबाबत, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली ( BCCI President Sourav Ganguly ) यांच्या सोबत चर्चा करणार आहेत. याबद्दल स्वत: रमीझ राजाने माहिती दिली आहे. परंतु या अगोदर भारतीय क्रिकेटने या प्रस्तावात कोणताही रस दाखवलेला नाही.

रमीझ राजा ( PCB chief Ramiz Raja ) नॅशनल स्टेडियममध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाले, त्यांनी एका स्पर्धेचा प्रस्ताव ठेवला आहे. भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे संघ देखील असतील. भारत आणि पाकिस्तानमधील खेळाडूंना एकमेकांविरुद्ध खेळण्याची अधिक संधी मिळावी. तसेच इतर आयसीसी सदस्य देशांचा महसूल वाढावा, हा या मागचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, दुबईत होणार्‍या एसीसी बैठकीदरम्यान मी सौरव गांगुलीशी याबद्दल बोलणार आहेत. आम्ही दोघेही माजी कर्णधार आणि खेळाडू आहोत. त्यामुळे आमच्यासाठी क्रिकेट हे राजकारणापेक्षा वेगळे आहे. ते म्हणाले, भारताने सहमती दर्शवली नाही, तर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसह तीन देशांची स्पर्धा पाकिस्तानमध्ये खेळवली जाऊ शकते. पुढील वर्षी आशिया कप खेळण्यासाठी भारतीय संघ पाकिस्तानात येईल ( Indian team will come to Pakistan ), असा विश्वास रमीझ राजा यांनी व्यक्त केला.

तसेच ते पुढे म्हणाले, मला वाटते ते येतील.जर ते आले नाहीत, तर आम्ही बघू काय करता येईल. बीसीसीआयचे सचिव जय शाह ( BCCI Secretary Jai Shah ) यांनी रमीझ यांचा हा प्रस्ताव आधीच नाकारला आहे. कारण भारताचे उद्दिष्ट खेळाचे जागतिकीकरण करणे आहे आणि अल्पकालीन आर्थिक लाभाचा हेतू नाही.

हेही वाचा - Ipl 2022 Updates : दिल्ली कॅपिटल्सच्या नवीन सहाय्यक प्रशिक्षकपदी शेन वॉटसनची नियुक्ती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.